बाळासाहेब बोराटे यांची भूमिका राजकीय वादळ ठरणार ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  प्रभाग एक आणि २८ मध्ये तीन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक आहे. हा प्रकार उघडकीस आणणारे विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे हे देखील राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. प्रशासकीय पातळीवरील अधिकारी प्रथमदर्शनी या गैरव्यवहारात असले, तरी यात कोणी नगरसेवक गुंतलेला असेल, तर त्याला देखील सोडू नका. त्यांच्यावर देखील फौजदारी कारवाई करा, अशी भूमिका बोराटे यांनी मांडली आहे. बोराटे यांची ही भूमिका आगामी राजकीय वादळ ठरण्याचे संकेत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
उपायुक्तांच्या या बिलांवर सह्या आहेत. त्याचप्रमाणे विभागप्रमुखांच्या देखील सह्या आहेत. काही बोगस सह्या आहेत. बिल मंजूर करताना पाहणी अहवाल व कामाचे छायाचित्र पाहून सही केली गेल्याचे उपायुक्त विक्रम दराडे यांनी सांगितले. कामच झाले नसेल, तर गंभीर बाब आहे. कामातील तांत्रिक बाबी प्रशासकीय पातळीवर अवगत नसतात. आयुक्त यांच्यासमोर झालेला प्रकार मांडू. त्याची चौकशी करू, असे विक्रम दराडे यांनी स्पष्ट केले. अशी भूमिका मांडून देखील, प्रशाकीय पातळीवरील अधिकारी या प्रकारामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत.

मंजूर कामांची खतावणी रेखांकन व विकासभार रजिस्टरमध्ये होते. या कामांची नोंद झाली की नाही, याच्या चौकशीसाठी बाळासाहेब बोराटे यांनी रजिस्टर स्थायी समितीच्या बैठकीत बोलवले. हे रजिस्टर आल्याशिवाय बैठक पुढे सुरू होणार नाही, अशी भूमिका मांडून त्यांनी प्रशाकीय अधिकाऱ्यांची चांगली कोंडी केली.

रजिस्टर आणण्यासाठी बोराटे हे शहर अभियंता यांना वारंवार सूचित करत होते. पण, त्याच्याशी आपला काय संबंध, अशी भूमिका शहर अभियंता यांनी घेतली. सुमारे दीड तासानंतर रेखांकन व विकासभार रजिस्टर स्थायीच्या सभागृहात आले. हे रजिस्टर सभागृहात अशा पद्धतीने पहिल्यांदांच आणले गेले. रजिस्टर येताच काहीनी टाळ्या वाजविल्या, तर काहींनी असं देखील रजिस्टर असतं, असं आश्चर्य व्यक्त केलं.

चितळेरोडवरील नेहरू मार्केटच्या उभारण्याचा मुद्दा सभापती सुवर्णा जाधव यांनी स्वत: बैठकीसमोर आणला. बांधा, वापरा, हस्तांतरीत करा, असा काहींनी यावर बाजू मांडली. स्थायीचे सदस्य दत्ता कावरे यांनी याबाबत काही आक्षेप नोंदविले. नेहरू मार्केटच्या कामाच्या निविदेच्या मूल्यांकनाचा वाद शासनाच्या नगरविकास खात्यांपर्यंत गेला आहे. विकासकाने काढलेल्या मूल्यांकनावर पूर्वी आक्षेप घेतले गेले आहेत. नगरविकास खात्याकडे असलेल्या प्रस्तावानुसार नेहरू मार्केटच्या विकासाचे मूल्यांकन सव्वा नऊ कोटी रुपये निघते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
असे असताना महापालिकेने नेहरू मार्केटचे काम स्वत: करावे. त्यात संस्थेचा फायदाच होईल, अशी भूमिका कावरे यांनी मांडली. सहायक नगर रचनाकार संतोष धोंगडे यांनी यावर शासनाकडून मूल्यांकन करून घेऊ, अशी बाजू मांडली. स्थायीने देखील यावर होकार दर्शविला. त्यामुळे नेहरू मार्केटच्या कामाच्या मूल्यांकनासाठी महापालिका लवकरच नगरविकास खात्याकडे प्रस्ताव पाठविणार आहे.

कावरे म्हणाले, 'नेहरू मार्केटच्या कामाचे मूल्यांकन एका विकासकाने सव्वा दोन कोटी रुपये मांडली होती. नगरविकास खात्याकडे याच कामाचे मूल्यांकन सुमारे नऊ कोटी रुपये निघाले. नेहरू मार्केटचे लोकेशन नगरसाठी 'प्राईंम' असेच आहे. त्यावर उभी राहणारी इमारत देखील चांगलीच झाली पाहिजे.

हे करताना संस्थेचे पर्यायाने नगरकरांचा आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ती आम्ही रखवालदार म्हणून करत आहोत.'नेहरू मार्केटच्या विकासाचा मुद्दा पुन्हा यानिमित्ताने चर्चेत आला आहे. हे मार्केट विकास करण्याच्या नावाखाली पाच वर्षापूर्वी पाडण्यात आले होते. मार्केटची इमारत पाडली, पण पुन्हा उभी करताना अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत.

पथदिव्यांच्या कामातील गैरव्यवहराबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार असल्याची भूमिका विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे व माजी सभापती सचिन जाधव यांनी मांडली. दोन दिवसांत या प्रकारावर महापालिकेच्या प्रशाकीय विभागाकडून कार्यवाही अपेक्षीत आहे.

यातील दोषी समोर आलेच पाहिजे. संगमताने हा भ्रष्टाचार झाला आहे. समितीची नेमणूक करून चौकशी नको, थेट गुन्हे दाखल करा. प्रशासकीय पातळीवर झालेल्या या भ्रष्टाचारात नगरसेवकाचे नाव येत असेल, तर त्याला देखील सोडू नका. ही संस्था लोकांची संस्था आहे. येथे लोकांचा पैसा त्यांच्याच विकासासाठी लागला गेला पाहिजे. 'दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेच पाहिजे', अशी भूमिका बोराटे व जाधव यांनी मांडली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.