पंचवीस वर्षे 'त्यांनी' जनतेला फक्त झुलवले त्यामुळे 'त्यांची' दुकानदारी कायमची बंद - आ.कर्डिले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ज्यांनी पंचवीस वर्षे सत्ता भोगली व तालुका वेठीस धरत जनतेला फक्त झुलवत ठेवण्याचे काम के ले. त्यामुळेच 'त्यांची' दुकानदारी कायमची बंद झाली असल्याची टिका आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केली.राहुरी तालुक्यातील दरडगावथडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुर्यभान रोकडे होते.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS 
--------------------------------
आ.कर्डिले म्हणाले की, लोकसभेला दरडगाव थडी या गावाने निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी आपण शब्द दिला होता की मत देऊ नका परंतू तुमचा रस्ता आपण पुर्ण करु. मताच्या राजकारणापेक्षा समाज हिताचे काम केले. हे गाव तसे दुर्लक्षित. आजवर या गावाने मला सर्वात कमी मते दिली. तरीही मी दिलेला शब्द पाळला. हे गाव धरणग्रस्त गाव आहे. सध्या के.के.रेंजचा विषय महत्वाचा आहे.

आपण हमी देतो की एक गुंठाही जमीन शेतकऱ्यांची जाऊ देणार नाही. के.के रेंजचा विषय आजचा नाही. त्यावेळी शरद पवार हे संरक्षण मंत्री होते. त्यावेळी तालुक्याचे पुढारी झोपले होते का ? पुढील आठवड्यात के.के. रेंज विषयी मुख्यमंत्र्यसमवेत बैठक होणार असून यात नगर, पारनेर, राहुरी तालुक्यातील सर्व प्रतिनिधी बरोबर घेणार असून वस्तूस्थिती जनतेसमोर येणार आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
लोकांची दिशाभुल करून मला राजकीय पोळी भाजायची नाही. राहुरी व पारनेर दरम्यान मुळा नदीवर पुल मंजुरी ही जरी मागील सरकारच्या काळातील असली तरी या पुढाऱ्यांनी लोकांना झुलवत ठेवले. पुढील महीन्यात हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. याबाबत आ. विजय औटी यांची मोलाची साथ लाभली आहे. यावेळी कॉ. गंगाधर जाधव यांनी के.के. रेंजसाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.