अहमदनगर महापालिकेत ४० लाखांचा गैरव्यवहार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पथदिव्यांची कामे झाले नसताना त्याची परस्पर सुमारे ४० लाख रुपयांची बिले काढली गेली आहेत. विशेष म्हणजे, मुख्य लेखापरिक्षण अधिकारी यांच्या बिलावर बोगस सह्या असल्याचा प्रकार स्थायी समितीच्या बैठकीसमोर आला आहे. विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे यांनी हे प्रकरण स्थायी समितीच्या बैठकीत मांडताच प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थायीच्या सदस्यांनी केल्यानंतर सभापती सुवर्णा जाधव यांनी या गैरव्यवहाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
प्रभाग एक आणि २८ मधील पथदिव्यांचे सुमारे २० कामे प्रशासकीय पातळीवर मंजूर करण्यात आली होती. एका कामामध्ये सुमारे सात पथदिव्यांच्या कामाचा समावेश आहे. या कामांची बिले उपायुक्तांच्या सहीनुसार अदा देखील झाली आहेत. पण, ही कामे प्रत्यक्षात झाली नाहीत. विशेष म्हणजे, कामे झाली असती, तर रेखांकन व विकासभार रजिस्टरमध्ये त्यांची नोंद असती. 

ती देखील नाही. बिल मंजुरीवर मुख्य लेखापरिक्षण अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या असल्याचे या बैठकीत उडकीस आले. हा सुमारे ४० लाख रुपयांचा गैरव्यवहार असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे यांनी यात सहभागी असलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. मंजूर झालेल्या बिले दाखविताना यावर अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या झाल्याचे देखील त्यांनी सांगितले.

मुख्य लेखापरिक्षण अधिकारी यांची सही बोगस असल्याचे येथे उघडकीस आले. बैठकीत मुख्य लेखापरिक्षण अधिकारी यांनी देखील सही आपली नसल्याचा खुलासा करत, ज्या दिवशी ही सही झाली त्या दिवशी मी आजारी असल्यामुळे कार्यालयात नव्हतो. विशेष म्हणजे, त्या दिवशीच्या रजेचा अर्ज देखील भरून द्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य लेखापरिक्षण अधिकाऱ्यांनी भूमिका मांडल्यावर उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. बिलावरील स्वाक्षऱ्यांबाबत इतर अधिकाऱ्यांनी शहानिशा करत नकार दिला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मंजूर झालेले कामे व त्याचे अदा झालेल्या बिलाची खतावणी रेखांकन व विकासभार रजिस्टरमध्ये आहे की नाही, याची शहानिशा यावेळी करण्यात आली. त्यातही या कामाची खतावणी नसल्याचे समोर आले. ही बाब गंभीर असल्याची नाराजी सभापती सुवर्णा जाधव यांनी व्यक्त केली. जाधव म्हणाल्या, 'प्रशासकीय पातळीवर गोंधळ दुर्दैवी आहे. प्रत्येक कामासाठी येथे मोर्चा घेऊन यावे लागते. मनपाने आपल्या कामाच सुधारणा करावी. झालेल्या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत.'

स्थायी समितीचे सदस्य सचिन जाधव, संजय शेंडगे, मुदस्सर शेख, बाबासाहेब वाकळे, दत्ता कावरे, नलावडे, कलावती शेळके, अनिता राठोड, अनिता भिंगारदिवे, उपायुक्त विक्रम दराडे, नगरसचिव तडवी, मुख्य लेखापरिक्षक अधिकारी चंद्रकांत खरात, कॅफो दिलीप झिरपे, सहायक नगररचना संतोष धोंगडे उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.