वर्षभरात कोपरगाव शहरात साडेचार कोटींची विकासकामे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव नगरपालिकेत विजय वहाडणेंना नगराध्यक्षपदाचे सूत्र हाती घेऊन 28 डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. तब्बल 4 कोटी 58 लाख 402 रुपये खर्च करून शहरात विकासकामे केल्याचा दावा वहाडणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पालिकेच्या दालनात वहाडणे यांनी एका वर्षाच्या कार्यकाळामध्ये शहरात केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी प्रभागनिहाय कामांचे विकासपत्रक दिले. प्रत्येक प्रभागात खर्च केलेली अंदाजे रक्‍कम अशी : प्रभाग 1- 13 कामांसाठी 33 लाख 66 हजार 427 रुपये, प्रभाग 2- एका कामासाठी 70 हजार 845, प्रभाग 3 – 6 कामांसाठी 46 लाख 20 हजार 116, प्रभाग 4 – 11 कामांसाठी 42 लाख 70 हजार 716, प्रभाग 5 – 11 कामांसाठी 50 लाख 63 हजार 330, प्रभाग 6 मध्ये 5 कामांसाठी 22 लाख 79 हजार 587, प्रभाग 7 मध्ये 11 कामांसाठी 28 लाख 27 हजार 936, प्रभाग 8 – 14 कामांसाठी 54 लाख 72 हजार 718, प्रभाग 9 मध्ये 7 कामांसाठी 13 लाख 69 हजार 246, प्रभाग क्र. 10 मध्ये 8 कामांसाठी 19 लाख 44 हजार 428, प्रभाग 11 – 5 कामांसाठी 16 लाख 35 हजार 117, प्रभाग 12 – 5 कामांसाठी 40 लाख 90 हजार 213, प्रभाग 13 मध्ये 10 कामांसाठी 35 लाख 97 हजार 25, प्रभाग 14 मध्ये 7 कामांसाठी 42 लाख 69 हजार 425, तर शहरातील इतर 15 कामांसाठी 1 कोटी 15 लाख 62 हजार 553 रुपये इतका खर्च केल्याची माहिती वहाडणे यांनी दिली.

शहरातील प्रस्तावित 10 कामे व नवीन 6 रस्त्यांच्या निविदा प्रसिद्ध केल्याचे वहाडणे यांनी सांगितले. या विकासकामांचे श्रेय कोणीही घेतले तरी चालेल मला फक्‍त विकास करायचा आहे, अशी टीका यावेळी विरोधकांचे नाव न घेता त्यांनी केली. पूर्वी नागरिकांच्या 90 टक्‍के तक्रारी स्वच्छतेच्या संदर्भात होत्या; त्या आता कमी झाल्या आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा करणाया जुन्या व नवीन पाइपलाइनचे लिकेज वाढले आहे. संबंधित ठेकेदाराच्या कामाचे बिल न दिल्याने हा प्रकार होत आहे. मुख्याधिकारी यांच्यामधील वादावर पडदा टाकण्यासाठी सर्व पक्षांच्या गटनेत्यांबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याची विनंती केली आहे. शहराच्या विकासासाठी आमदार कोल्हे यांच्यासह सर्व पक्षांच्या नेत्यांना बरोबर घेऊन विकास निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती वहाडणे यांनी दिली.
विरोधकांकडून वेगळाच सूर..कोपरगाव शहरात विकासकामे होत नाहीत, अशी तक्रार सामान्य नागरिकांपासून सर्व राजकीय पक्षाच्या नगरसेवकांची आहे. वर्षभरात कोणतेही भरीव काम झाले नाही. पूर्वीची जुनी विकासकामे अर्धवट अवस्थेत आहेत. वहाडणे यांच्या काळात कोणतेही नवीन काम झाले नाही, असा आरोप सर्वजण एका सुरात करीत आहेत. दुसऱ्या बाजूला वहाडणे यांनी विकासकामांचा पाढा वाचल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.