जेवणामध्ये मटण केले नाही म्हणून अंगावर रॉकेल टाकून पत्नीस दिले पेटवून !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पत्नीने जेवणामध्ये मटण केले नाही म्हणून पतीने अंगावर रॉकेल टाकून पत्नीस पेटवून दिल्याची घटना पटेलवाडी (ता. श्रीरामपूर) येथे घडली. गंभीररीत्या भाजलेल्या महिलेस साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि़ २९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
भाजलेल्या महिलेचे नाव आशाबाई नाना पारखे (वय ४०, रा.पारखेवस्ती, पटेलवाडी) असे आहे. पोलिसांनी महिलेचा रुग्णालयात जबाब नोंदवून आरोपी पती नानू चिलखू पारखे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता आरोपी नानू हा घरी आल्यानंतर जेवणासाठी मटण का केले नाही? याचा राग धरून पत्नी आशाबाई हिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत घरातील रॉकेलच्या कॅनमधील रॉकेल अंगावर ओतून चुलीतील जळत्या लाकडाने पेटवून देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन भाजलेल्या महिलेची भेट घेऊन जबाब नोंदविला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.