नगराध्यक्षांच्या अडवणुकीसाठी अधिकारी, ठेकेदारांचे संगनमत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :डेली मार्केट फी, रमाई आवास योजना, लाईट, पाणी, गटार, कचरा, आदी विषयांवरून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अधिकारी व ठेकेदार हे संगनमत करून नगराध्यक्षांचे ऐकत नाहीत. त्यामुळे 31 मार्चपर्यंत मंजूर कामे झाली नाहीत तर निधी परत जाणार आहे. याला अधिकारी जबाबदार राहतील, अशा शब्दांत सर्व नगरसेवकांनी नाराजी व्यक्‍त केली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर पालिकेची सभा झाली. उपनगराध्यक्ष करण ससाणे उपस्थित होते. प्रथमच सकाळी 11 वाजता सुरू झालेली पालिकेची सभा सायंकाळी 5 वाजता संपली. मुख्याधिकारी सुमंत मोरे उपस्थित नव्हते.

श्रीनिवास बिहाणी, दीपक चव्हाण, मुख्तार शहा, अंजुम शेख, राजेश आलघ, श्‍यामलिंग शिंदे, वैशाली चव्हाण, राजेंद्र पवार, संतोष कांबळे, प्रकाश ढोकणे, चंद्रकला डोळस, आदी नगरसेवकांनी वरील विषयावरून सभागृहात जाब विचारला. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे विकासकामे होत नाहीत. अध्यक्षांचेसुद्धा ऐकत नाहीत. उलट चुकीची माहिती देऊन भांडणे लावण्याचे काम करतात.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

मुख्याधिकारी विश्‍वासात न घेता कामे करतात, असे गंभीर आरोप करण्यात आले. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी डेली मार्केट फीवरून 2 ठेकेदारांनी 19 लाख 50 हजार रुपये पालिकेत भरले नाहीत; अशा ठेकेदारांवर गुन्हा दाखल का होत नाही? या नुकसानीला कोण जबाबदार आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला. 3 महिन्यांपासून शहरात खराब पाणीपुरवठा होत आहे. तक्रारी करूनही अधिकारी कामे करत नाहीत, अशी तक्रार डोळस, परदेशी, पवार, आदी नगरसेवकांनी केली.

शहरातील म्हाडा येथे पोलिसांसाठी 78 सदनिका दिल्या आहेत. तेथे 2 इंची पिण्याच्या पाण्याचे कनेक्‍शन दिले तर उद्या खासगी संस्था अशीच मागणी करेल. त्याऐवजी नियमाप्रमाणे अर्धा इंची कनेक्‍शन द्यावे. पाणीपुरवठ्याचे नियोजन व्यवस्थित नाही. त्यात सुधारणा करावी, अशी मागणी शिंदे, शेख, बिहाणी यांनी केली.

माझे दोनच गुरू आहेत स्वर्गीय गोविंदराव आदिक, माजी आमदार जयंतराव ससाणे,’ अशा शब्दांत त्यांचा अंजुम शेख यांनी गौरव केला. शहराचा विकास होत असताना नागरी सुविधा मिळाल्याच पाहिजेत. अवजड वाहनांसाठी शहराच्या बाहेरून “रिंग रोड’ व्हावा, असे ससाणे यांचे स्वप्न होते. तसा प्रस्तावही शासन दरबारी पाठवला. गोंधवणी रस्त्यावरील वाहतुकीमुळे नागरिकांचा त्रास कमी होईल. त्यासाठी नव्याने पाठपुरावा करावा.

गोंधवणी रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी आहे. त्यासाठी करण ससाणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे. हा निधी मिळेल. परंतु, सध्या सुवर्णजयंती योजनेमधील बचतीतून राहिलेले 50 लाख रुपये या रस्त्यासाठी खर्च करावा, अशी मागणी केली. या पैशांतून शहरातील खड्डे बुजवावे, अशी दुरुस्ती बिहाणी यांनी केली. संगमनेर-नेवासा रस्त्यावर सिल्कोट न करता ठेकेदाराला बिल अदा केले. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडल्याकडेही लक्ष वेधण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.