सकस साहित्य वाचनातूनच निकोप समाज निर्मिती होईल - डाॅ. कैलास दौंड यांचा आशावाद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पाथर्डी येथे दिनांक २३ व २४ डिसेंबर रोजी सतरावे पाथर्डी साहित्य संमेलन भगवाननगर येथे पार पडले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक डाॅ. कैलास दौंड यांनी सकस साहित्य हे समाजाला जगण्यास बळ देत असते. अशा सकस साहित्याच्या वाचनातूनच निकोप समाज निर्माण होईल असे मत व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, 'शेती नावाचा चक्रव्यूह कसा भेदायचा हा मोठाच प्रश्न आहे? माणूस वाचवणे महत्वाचे आहे. तसेच वाचनाच्या नव्या माध्यमाचे स्वागत करणे अपरिहार्य आहे. मात्र फेसबुक, व्हाॅटस्अॅप सारख्या माध्यमातून येणाऱ्या मजकुराची आपल्याला ऊपयुक्तता तपासता यावी लागेल. अन्यथा समस्या निर्माण होतील.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
ते आणखी पुढे म्हणाले की, आजही आपल्याकडील शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे चित्रण साहित्यिक जेव्हा कथा, कादंबरी, कविता मधुन करतात तेव्हा ते दरवेळी अधिक भयावह आणि हादरवून सोडणारे असते. ते पचवता न येण्याजोगे असते. 

'धग','पाचोळा', 'बारोमास','झाडाझडती', 'आलोक' ,'चाळेगत','ऐसे कुणबी भूपाळ', 'भुई भुई ठाव दे','कापूसकाळ','असं जगणं तोलाचं',' बुर्झ्वागमन ', 'आरंबळ',' बोलावे ते आम्ही',' अंधाराचा गाव माझा', 'भुईशास्र','मातीचे पाय' ,'काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान', 'धग असतेच आसपास' या व अशा काही साहित्यकृती मधुन हे वर्तमान अंगावर कोसळतांना दिसते . महात्मा फुल्यांचा 'शेतकऱ्यांचा आसूड' प्रत्येकाने वाचला पाहिजे. पूर्वीच्या शेतकऱ्यांपेक्षा आत्ताचा शेतकरी अधिक भयचकित आणि दबलेला, पिचलेला आहे. त्याच्या रोजच्या जगण्यातील घुसमट वाढलेली आहे.

कृष्णा भोजनालय साहित्य मंडळाच्या वतीने गेल्या सोळा वर्षापासून या साहित्य संमेलनाचे सातत्याने आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिकांनी या संमेलनाच्या माध्यमातून पाथर्डीकरांची मने जपली आहेत.सतराव्या पाथर्डी साहित्य संमेलनाचे उद्घाटक कवी गणेश मरकड यांनी देखील वाचनाचे महत्त्व विशद करणारे भाषण केले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या साहित्य संमेलनात दोन कविसंमेलने झाली. त्यात नागेश शेलार, संगीता होळकर -औटे, इंद्रकुमार झांजे, लक्ष्मण खेडकर, प्रवीण घुले, मनीषा पटेकर ,आनंदा साळवे, देवीदास शिंदे , ज्योती आधाट इत्यादी कवी सहभागी झाले. यावेळी बाबा बँडवाले, अॅड. अंकुश गर्जे, शिवाजी पवार, शशिकांत गायकवाड, पोपटशेठ गुगळे, मीना बांगर, सुनिल कटारिया, विमलताई पाठक आणि वृद्धेश्र्वर कावरे यांना व प्रयागा बडे (शिक्षण), प्रा. रमेश मोरगावकर (क्रिडा), डाॅ. भाऊसाहेब लांडे (आरोग्य ),उषाताई वाघमारे(सामाजिक ),भाऊसाहेब ढोले (स्पर्धा परीक्षा ),प्रा. दिलीप सरसे(साहित्य , प्रा. गोरक्ष शिरसाठ (शिक्षण),प्रा. लक्ष्मणराव सत्रे (शिक्षण ).यांना
शिक्षण, साहित्य, क्रिडा, समाजसेवा या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल पार्थभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

साहित्य संमेलनाच्या दोन्ही रात्री विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत वाढवली. साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा भोजनालय साहित्य मंडळाचे अध्यक्ष शाहिर भारत गाडेकर व सचिव वसंतराव बोर्डे यांच्यासह संस्थापक प्रा. अशोकराव व्यवहारे, गणेश तुपे, बबनराव भगत, रवींद्र दारके,अंबादास साठे, भाऊसाहेब गोरे, प्रा. रमेश बाहेती , हुमायुन आतार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.