चिचोंडी पाटीलच्या सरपंचाचा राजीनामा, चौदाव्या वित्त आयोगाच्या चौकशीमुळे राजीनामा?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील सरपंच सौ.अर्चना दीपक चौधरी यांनी नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांच्याकडे सरपंचपदाचा राजीनामा दिला व सभापती भोर यांनी तो मंजुर केला व संबंधित कार्यालयाकडे पाठवला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
ग्रामपंचायतला १४ व्या वित्त आयोगाचा निधी हा खूप मोठ्या प्रमाणात आला असून. सदर आलेल्या निधीची विल्लेवाट लावताना गावच्या विकासाच्या दृष्टीने काम न करता सादर निधीचा वापर हा ग्रामपंचायतने या पूर्वीच गावच्या विकासाच्यादृष्टीने जे कामे यापूर्वीच पूर्ण झालेली आहेत. अशा कामांत खर्च केला असे भाजपा किसान मोर्चा नगर तालुका अध्यक्ष बबन शेळके यांच्या लक्षात आली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना १४ वा वित्त आयोगाच्या कामाची चौकशी करून झालेल्या कामात गैरकारभार आढळून आल्यास दोषींनवर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले होते व त्या निवेदनावरूनच मा.जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागास कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यांनतर काही दिवसानंतर चिचोंडी पाटीलच्या सरपंचानी राजीनामा दिल्याने गावामध्ये चर्चेचे वातावरण बनले आहे. 

येथील रहिवासी गणेश इंगळे यांनीही चौदाव्या आयोगाची चौकशी व्हावी. यासाठी अधिकाऱ्यांना पाठपुरवठा केल्याने या कामाची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौदाव्या आयोगाच्या कामाचा अनेक गावांनमध्ये बोजवारा उडाला असून संबंधित वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेउन झालेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यत पोहचवावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. चिचोंडी पाटील येथील सरपंचांनी त्यांचा राजीनामा सभापतींनी चिचोंडी पाटीलचे उपसरपंच शरदभाऊ पवार यांच्या समक्ष मंजूर केला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.