आजपासून विसापूरचे आवर्तन सुटणार : आ.जगताप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विसापूर मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या नियोजना संदर्भात गुरूवार दि.२७ रोजी शासकीय विश्रामगृह विसापूर येथे कुकडीचे चेअरमन आमदार राहुल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यात रब्बी आवर्तन दि.२९ रोजी सकाळी ६.०० पासून सुरु करण्याचे आ.जगताप यांनी सांगितले. ----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
हे आवर्तन २५ ते २६ दिवस चालेल. विसापूर धरण १०० टक्के भरलेले आहे. त्यामुळे विसापूरची तीन आवर्तने देण्याचे ठरले, पाणी कमी पडल्यास, कुकडी कॅनॉलमधून पाणी घेण्याचे ठरले. हंगामातील पिकांच्या पाण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. विसापूर खालील सर्व चाऱ्यांची साफसफाई करण्याचे ठरले.

त्यामुळे पाण्याची बचत होईल. रब्बी हंगामात सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे. याचे नियोजन विसापूर खालील अधिकारी व पाणी वापर संस्थाचे चेअरमन यांनी बैठक घेवून एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेवून नियोजन करावे. चालू आवर्तनात शेतकरी व अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक पाणी वापरावे.पाण्याचा अपव्यय टाळावा.असे आवाहन केले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
यावेळी कुकडीचे कार्यकारी अभियंता कोळी, उपअभियंता सोळुंके, कालवा सल्लागार समिती सदस्य बापु नाथु इथापे, संजय जगताप, सुभाष गायकवाड, नितीन शिंदे, इथापे रावसाहेब, कदम रावसाहेब, पवार रावसाहेब आणि देसाई रावसाहेब उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.