तेलीखुंट परिसरात दोन गटात दगडफेक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरातील शहरातील तेलीखुंट परिसरात रात्री ९.३० ते ९.४५ दरम्यान लहान मुलांच्या झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोन गटात वाद झाले. मात्र या वादाचे रूपांतर नंतर दगडफेकीत झाल्याने या परिसरात तणावपूर्ण वातावरण झाले होते.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर असे की, या परिसरातील लहान मुलांचे दुपारी किरकोळ वाद झाले होते. मात्र रात्री परत या वादावरून दोन्ही गट परत एकमेकांसमोर आल्याने शाब्दीक वाद विकोपाला गेले व शेवटी दगडफेकीची घटना घडली. यावेळी दोन्ही गटाने एकमेकांवर सोडावॉटरच्या बाटल्या, दगड, विटांचे तुकडे, लाकडी दांडके यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. या दगडफेकीच्या घटनेमुळे मात्र या परिसरात एकच धावपळ उडाली. सर्वजन वाट मिळेल त्या दिशेला पळत होता. या भागातील सर्व लहान मोठ्या व्यावसायिकांनी तात्काळ दुकाने बंद केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
दरम्यान या घटनेबाबत कांतवाली पोलिसांना माहिती मिळताच कोतवालीचे पोलिस निरीक्षक अभय परमार,कॉ.सय्यद, शहर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे,पी.आय.सुरेश सपकाळे,एलसीबीचे दिलीप पवार,राजू वाघ,सुमीत गवळी,बर्डे आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व परिस्थीती नियंत्रणात आणली. दरम्यान रात्री उशिरापर्यंत एकमेकांवर गुन्हे दाखल करण्याचे कामसुरू होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.