स्वच्छ वॉर्डला ५० लाख तर शहराला २० कोटींचे बक्षीस.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मुंबई : राज्‍यातल्‍या शहरांमध्ये आता स्‍वच्छ वॉर्ड स्‍पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्‍वच्छ सर्वेक्षणात अव्वल येणाऱ्या शहरांना प्रोत्‍साहनपर बक्षीस देण्यात येणार असल्‍याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. केंद्र सरकारच्या स्‍वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्‍ट्राचा क्रमांक वरचा येण्यासाठी शहरे स्‍वच्छ राहिली पाहिजेत. राज्‍यातील जास्‍तीत जास्‍त शहरांचा स्‍पर्धेतील बक्षीसपात्र शहरांत समावेश व्हावा, यासाठी स्‍थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
केंद्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या शहरांच्या स्वच्छ सर्वेक्षणाची आढावा बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी त्यांनी स्वच्छ वॉर्ड स्पर्धेची व अमृत शहरे व अमृत योजनेत सहभागी नसलेल्या शहरांसाठी प्रोत्साहनपर बक्षिसांची घोषणा केली. या वेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह भिवंडी, उल्हासनगर, पनवेल, ठाणे आदी महानगरपालिकांचे महापौर, आयुक्त, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, मुंबईचे आयुक्त अजोय मेहता आदी उपस्ि‍थत होते. मुख्यमंर्त्यांनी या वेळी जिल्‍हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवादही साधला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
येत्या १ जानेवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा होणार आहे. मार्च महिन्यात त्रयस्थ संस्थेमार्फत या स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार असून यातील पहिल्या तीन वॉर्डना बक्षिसे देण्यात येणार आहेत. 'अ' व 'ब' वर्ग महानगरपालिकांतील पहिल्या तीन वॉर्डना अनुक्रमे ५० लाख, ३० लाख व २० लाख तर 'क' व 'ड' वर्ग महानगरपालिकेतील वॉर्डना अनुक्रमे ३० लाख, २० लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे तसेच 'अ' वर्ग नगर परिषदेसाठी अनुक्रमे ३० लाख, २० लाख व १५ लाख तर 'ब' वर्ग नगर परिषदांसाठी २० लाख, १५ लाख, १० लाख आणि 'क' वर्ग नगर परिषदांसाठी अनुक्रमे १५ लाख, १० लाख व ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. अमृत योजनेत समाविष्ट शहरांमध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिल्या तीन गुणानुक्रमात आलेल्या राज्यातील शहरांना २० कोटी, तर ४ ते १० क्रमांकामध्ये आलेल्या शहरांना १५ कोटी देण्यात येणार आहेत. अमृत योजनेत समाविष्ट नसलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागीय गुणानुक्रमात येणाऱ्यांसाठीही बक्षिसे जाहीर करण्यात आली असून यामध्ये पहिल्या ३ क्रमांकात येणाऱ्या शहरांना १५ कोटी, ४ ते १० क्रमांकामध्ये येणाऱ्यांना १० कोटी, तर ११ ते ५० क्रमांकामधील शहरांना ५ कोटी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केली.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.