श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणारा नगरचा व्यापारी जेरबंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील जवळपास २० कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा व्यापारी अमोल प्रकाश गुंड. याला गुरूवार दि. २८ रोजी श्रीगोंद्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे यांनी नगर येथून ताब्यात घेतले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
तालुक्यातील पारगाव येथील शेतकरी नीलेश कबीर लडकत, सीताराम लक्ष्मण भोर, अरुण सीताराम जगताप, सुभाष संतू ढोले, गुलाब गंगाराम बोडखे, सोनदेव मारुती बोडखे, संजय मारुती इथापे, बापूसाहेब दत्तू सपताळ, सर्व रा.पारगाव. या शेतकऱ्यांनी पारगाव सुद्रिक येथील एका व्यक्तीच्या ओळखीने कांदा व्यापारी अमोल प्रकाश गुंड, प्रकाश राजाराम गुंड, विकास सोनवणे सर्व रा.वडगाव तांदळी ता.जि. अ.नगर यांनी कांदा दिला होता.

या महाठग व्यापाऱ्यांनी पारगाव सुद्रिक मधील काही शेतकऱ्यांकडून सुरुवातीला कांदा खरेदी केला. त्याचे पैसे दिले. त्यानंतर एप्रिल ते मे २०१७ या दरम्यान नीलेश लडकत यांच्याकडून २ लाख रूपयांचा ५० टन कांदा खरेदी केला होता. त्यापैकी ६७ हजार ११६ रुपये लडकत यांना दिले. उर्वरित रक्कमेचे चेक लिहून दिले होते. लडकत यांनी ते चेक भरले असता दोन वेळा ते चेक वठले नाहीत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
त्यावर लडकत यांनी या व्यापाऱ्यांना पैशांची मागणी केली असता. त्यांनी पैसे देणार नाही काय करायचे ते करून घ्या असा दम दिला. लडकत यांच्याप्रमाणेच इतर सातजणांनाही चेक दिले होते, ते देखील वठले नाहीत. त्यांनी पैसे मागितले असता, त्यांनाही उडवाउडवीची उत्तरे देऊन शिवीगाळ केली. 

त्यामुळे या शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शेतकरी नीलेश लडकत यांनी कांदा व्यापारी अमोल प्रकाश गुंड, प्रकाश राजाराम गुंड, विकास सोनवणे यांच्या विरोधात दि ८/९/१७ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. 

त्यानंतर श्रीगोंदा पोलीस या आरोपींचा शोध घेत होते. परंतु हे महाठग सापडत नव्हते. परंतु आज दि.२८ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे यांनी यातील मुख्य आरोपी अमोल प्रकास गुंड याला अ.नगर येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.