आमदार कर्डिलेंच्या दबावामुळे मंत्र्यांचा कार्यक्रम रद्द झाला !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-राहुरी नगरपालिकेच्या वतीने जोगेश्वरी आखाडा येथे २.५० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा शुभारंभ राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत होणार होता; पण तो होऊ नये, यासाठी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी मंत्र्यांवर वरिष्ठांकडून राजकीय दबाव आणून हा कार्यक्रम रद्द करण्यास कर्डिले यांनीच भाग पाडल्याचा आरोप नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शुक्रवारी (दि. २९) जोगेश्वरी आखाडा येथे १३व्या वित्त आयोगातून नवीन जलकुंभासाठी वितरण व्यवस्थेची उभारणी करणे व चाचणी देणे तसेच येवले आखाडा येथे राज्य मार्ग ते येवले आखाडा रस्त्याचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे हस्ते व शिर्डी संस्थांचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम होऊ नये यासाठी आमदार कर्डिले यांनी राजकीय हेतुने भाजपच्या वरिष्ट नेत्यांकडून मंत्र्यावर दबाव आणला व कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले, असा आरोप नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी केला.

वास्तविक राज्याचे पाणीपुरवठा बबनराव लोणीकर यांनी कोणताही राजकीय हेतु न ठेवता केवळ तालुक्यातील विकास कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने नगरपालिकेचा कार्यक्रम घेतला होता. यात राहुरी शहराच्या २९ कोटी रुपये खर्चाच्या सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूरीबाबत चर्चा करण्यात येणार होती.

तसेच तालुक्यातील कुरणवाडीसह ९ गावांच्या पाणी योजनेसह मतदारसंघातील रखडलेल्या पाणी योजनांच्या प्रश्नाबाबत संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या समवेत चर्चा होणार होत्या. त्यासाठी मंर्त्यांनी वेळ देऊन संबंधित गावातील प्रमुखाबरोबर बोलणार होते. पण केवळ श्रेयवादातुनच कर्डिले यांनी मंर्त्यांवर दबाव आणून कार्यक्रम रद्द करण्यास भाग पाडले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तनपुरे म्हणाले, की कर्डिले आमदार झाल्यापासून त्यांनी कधीही तालुक्यात मंर्त्यांना आणून कामांचे उद्घाटन केली नाही. असे असताना आम्ही तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे यासाठी हा कार्यक्रम आयोजीत केला होता. आमदार कर्डिले यांनी आमदार म्हणून शहरातील तालुक्यातील किती विकासाची प्रश्न मार्गी लावलीत, हा गंभीर विषय असून नगरपालिकेने त्यांना तालुक्याचे आमदार या नात्याने पालिकेच्या अडचणींसंदर्भात काही प्रश्न लेखी स्वरुपात पाठविले होते.

त्यांच्या बरोबर जिल्ह्यातील काही आमदारांनाही तसे लेखी पत्र दिले असता त्या इतर आमदारांनी त्या पत्राची दखल घेतली; पण तालुक्यांचे आमदार यांनी राजकीय हेतु डोळ्यासमोर ठेऊन त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आरोप तनपुरे यांनी केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.