देशातील जनतेचे पैसे पांढ-या दाढीचा सांताक्लॉज पळवत आहे : काँग्रेस.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पांढ-या दाढीचा म्हातारा मनुष्य संपूर्ण जगभरात लोकांना पैस, भेटवस्तू देत फिरत आहे. पण देशातील जनतेचे पैसे पांढ-या दाढीचा सांताक्लॉज पळवत असल्याचे ट्विट करत काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
सुरूवातीपासूनच जीएसटी आणि नोटाबंदीचा काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा याच मुद्यावर भाजपवर टीका केली आहे. पांढ-या दाढीचा म्हातारा माणूस सध्या संपूर्ण जगात नकळतपणे लोकांच्या घरात जाऊन त्यांच्या मोज्यात पैसे आणि भेटवस्तू ठेवत आहे. 

पण याउलट भारतातील परिस्थिती असून येथे पांढ-या दाढीचा वृद्ध माणूस टीव्हीतून तुमच्या घरात शिरतो. घरात शिरल्यानंतर तो लोकांची पाकिटे, कपाट. लॉकर सर्व ठिकाणचे पैसे काढून घेतो. त्यामुळे तुमच्या अंगावर फक्त मोजेच शिल्लक राहतात, असे तिवारी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.