नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा बोलबाला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर जिल्ह्यातील दुसऱ्या टप्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी (दि. २७) जाहीर झाला. जनतेतून ६६ नव्या सरपंचांची निवड झाली आहे. जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीवर कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचाच बोलबाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
त्या त्या तहसिल कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आले. निकालामुळे कही खुशी तर कही गम असेच चित्र निर्माण झाले. कॉँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपापल्या ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व कायम ठेवले. काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश स्थानिक स्तरावर मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर लढविण्यात आली नसली तरी अप्रत्यक्षरित्या पक्षाचेच समर्थक निवडणुकीच्या रिंगणात होते. स्थानिक नेत्यांनी आघाड्या करुन निवडणुका लढविल्या. राहुरीत माजी आमदार प्रसाद तनपुरे गटाकडे ३ तर विखे गटाकडे २ ग्रामपंचायतींची सत्ता गेली आहे. एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
श्रीरामपूरात भानुदास मुरकुटे गटाकडे ४ तर ससाणे, विखे गटाने प्रत्येकी १ ग्रामपंचायतीची सत्ता मिळविली आहे. संगमनेरमध्ये थोरात गटाने आपला गड शाबूत ठेवला. राहत्यात विखे गटाचे वर्चस्व कायम राहिले. कोपरगावमध्ये भाजप व राष्ट्रवादीकडे अनुक्रमे ३ व २ ग्रामपंचायती गेल्या आहेत. एका ठिकाणी शिवसेनेन बाजी मारली. नेवाशात समसमान लढाई झाली. 

भाजपाकडे ४ तर गडाख गटाने ३ जागा मिळविल्या आहेत. उत्तरेत एकंदरीत आघाडीचाच बोलबोला दिसून आला. उत्तरेसारखाच दक्षिणेतही कॉँग्रेस राष्ट्रवादीनेच बाजी मारली. श्रीगोंदा, शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादी व कॉँग्रेसचेच प्राबल्य राहिले. नगर तालुक्यात संमिश्र निकाल राहिला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.