सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे साईचरणी कोट्यवधींचे दान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अनेक साईभक्तांनी शनिवार-रविवार आणि नाताळ अशा सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डीकडे धाव घेतली. साईबाबांच्या झोळीत त्यामुळे चार दिवसात कोट्यवधींचे दान जमा झाले आहे. सलग आलेल्या सुट्टयांमुळे शिर्डी संस्थानाला पाच कोटी ५० लाख रुपयांचे एकूण दान मिळाले आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
३ कोटी १० लाख रुपये साईबाबांच्या दानपेटीत जमा झाले आहेत. तर २२ लाख रुपये किमतीचे सोने, तर दोन लाखांची चांदी साईबाबांच्या झोळीत जमा झाली आहे. मागील वर्षी पाच दिवसात आलेल्या दानाच्या तुलनेत यावेळी तब्बल एक कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. राज्यातूनच नव्हे तर देशभरातील साईभक्त शिर्डीला दर्शनासाठी येतात.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
साईबाबांच्या दानपेटीत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दान जमा होते. शिर्डीत २२ डिसेंबरपासून साई भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सलग आलेल्या सुट्ट्या आणि नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या साईभक्तांनी बाबांच्या दानपेटीत देणगी स्वरुपात पाच कोटी ५० लाख रुपयांचे विक्रमी दान अर्पण केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.