ट्रॉली पलटी झाल्याने एकजण चिरडून जागीच ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शामुल प्रेमदास कणगरे (वय ५५, रा.मुकिंदपूर ता.नेवासा) हे मृताचे नाव आहे. हा ट्रॅक्टर नेवासा फाट्याकडे जात होता. यावेळी रस्त्याने जात असलेले कणगरे टँक्टर ट्रॉलीखाली चिरडून जागीच ठार झाले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.