विकासात्मक कामांच्या माध्यमातून राष्ट्रवादीने लावला सावेडी उपनगरात शिवसेनेला सुरुंग !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सावेडी उपनगरातील शिवसेनेचे माजी शहर विभागप्रमुख तथा उद्योजक संजय बुधवंत यांच्यासह उपनगरातील अनेक कार्यकर्त्यांचा गुरुवार दि.28 डिसेंबर रोजी पाईपलाईन रोड येथे सायंकाळी 6 वा. एकवीरा चौक येथे होणार्‍या राष्ट्रवादीच्या भव्य मेळाव्यात प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
यावेळी जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार अरुणकाका जगताप, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते व उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर यांनी दिली.

मागील 25 वर्षांपासून शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी भरीव कामगिरी केली आहे. या कामाने प्रेरित होवून अनेक शिवसेनेचे माजी पदाधिकारी व कार्यकर्ते एकाच दिवशी एकाच व्यासपीठावर शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून, विकासाची धुरा हातात घेऊन तरुणांना आकर्षित करणारे नव्या दमाचे नेते आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यामुळे सावडी उपनगरात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे. या राजकीय घडामोडी ने थंडीच्या काळात ही राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. विकासात्मक ध्येय, उद्दिष्ट समोर ठेवून नगरकरांच्या सेवेसाठी संपूर्ण शहर राष्ट्रवादीमय करण्याचा मानस आमदार संग्राम जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केला आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.