नगर-औरंगाबाद महामार्गावर प्रवाशास मारहाण करून लुटले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पुणे येथून औरंगाबादला जाणाऱ्या एका प्रवाशास खाजगी वाहतूक करणाऱ्या जीपचालकासह चौघा जणांनी मारहाण करत लुटल्याची घटना रविवारी (दि. २४) मध्यरात्री नगर-औरंगाबाद महामार्गावरील एका हॉटेलमागे घडली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुरज संभाजी शिंदे (रा. चिखलठाण एमआयडीसी, औरंगाबाद) हे औरंगाबाद येथे जाण्यासाठी माळीवाडा बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे असताना खाजगी प्रवासी वाहतूक करणारी एक स्कॉर्पीओ गाडी तेथे आली. या गाडीत वाहनचालकासह चौघे जण बसलेले होते. वाहनचालकाने शिंदे यांना औरंगाबादला यायचे का असे म्हंटले असता शिंदे हे गाडीत बसले. ही गाडी मार्केटयार्डपासून थोडी पुढे आली असता गाडीतील तीन अनोळखी प्रवाशांनी शिंदे यांना बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.

तसेच आरडाओरड न करण्याची धमकी देत औरंगाबाद रोडवरील एका हॉटेलच्या मागे नेले व तेथे बारा हजार रुपये किंमतीचा मोबाईल, साडेसातशे रूपये किंमतीचे घड्याळ व काही कागदपत्रांसह जवळपास १४ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेत सोडून दिले.या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात शिंदे यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो. स. ई. शिवाजी नागवे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.