जनावरे शेतात गेल्याने कुऱ्हाडीने मारहाण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जनावरे ज्वारीच्या पिकात गेल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना चिचोंडी पाटील शिवारातील कडका परिसरात घडली. याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चलुधर बबन मेहेत्रे (वय ३९, रा. चिचोंडी पाटील, ता. जि. नगर) यांची जनावरे ज्वारीच्या पिकात गेल्याच्या कारणावरून कैलास नामदेव हजारे, शुभम कैलास हजारे, ऋषीकेश कैलास हजारे, नामदेव तुकाराम हजारे (सर्व रा. चिचोंडी पाटील) यांनी मेहेत्रे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.

कैलास हजारे याने यावेळी मेहेत्रे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने मारले तर शुभम हजारे याने हातावर व बरगडीस काठीने मारहाण करून जखमी केल्याचे मेहेत्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. हे. कॉ. आर. एन. शेलार हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.