गडाख यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माजी खा. यशवंतराव गडाख यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यांच्या सामाजिक, राजकीय व साहित्य क्षेत्रातील कारकिर्दीलाही ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जानेवारी महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी त्यांच्या आजपर्यंतच्या जीवन प्रवासावर आधारीत वेगळ्या वाटेनं या चित्रफितीचे प्रकाशन होणार आहे. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
तसेच धर्मविराम, सहवास, अंतर्वेध व माझे संचित या श्री गडाख लिखीत पुस्तकांतील निवडक अवतरणांच्या (कोट्स) संपादीत 'कवडसे' या पुस्तकांचे प्रकाशन आयोजित केले आहे. हा कार्यक्रम शुकवार दि.२९ डिसेंबर २०१७ रोजी सायं. ५ वा. अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात होणार असल्याची माहिती प्रशांत गडाख यांनी दिली आहे.

या चित्रफितीचे व कडवसे पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक व अभिनेते संदेश कुलकर्णी व अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ही चित्रफित दाखविली जाणार आहे. याबाबत बोलताना यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी सांगितले की, श्री गडाख यांनी गेल्या ५० वर्षात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी व साहित्य क्षेत्रात संस्मरणीय योगदान दिले आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
हा सर्व प्रवास एकत्रितरीत्या संकलीत करून प्रतिष्ठानने ७० मिनीटांचा माहितीपट तयार केलेला आहे. राजकारणा बरोबरच कला, साहित्य, संस्कृती आणि कुटुंब यातील रुची त्यांनी आयुष्यभर जोपासली. आजच्या तरुणांना त्यांच्या साचेबद्ध बनू पाहणाऱ्या जीवनशैलीला विविधरंगी करताना या अनुभवांचा उपयोग होईल. 

कष्ट आणि जिद्दीने आयुष्य जगराऱ्यांना तो प्रेरणादायी ठरेल. म्हणून वेगळ्या वाटेनं या माहिती पटाच्या प्रकाशनास आपण आवर्जुन उपस्थित रहावे, ही आग्रहाची विनंती यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.