सांडपाण्यातून १०० एकर क्षेत्र ओलिताखाली !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :युटेक शुगर लिमिटेड साखर कारखान्याने सांडपाण्याचे शुद्धीकरण करुन ते येथील गरीब शेतकऱ्यांच्या शेतीला देण्याचे काम स्वखर्चातून सुरु केले आहे. सध्या पाईप लाईनचे काम सुरू केले. त्यामुळे उजाड माळरानावरील १०० एकर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. खडकाळ माळरानावर हिरवळ फुलवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल कारखान्याने टाकल्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी सांगितले.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
संगमनेर तालुक्यातील कौठे-मलकापूर येथील युटेक शुगर लिमिटेड पहिल्या खासगी साखर कारखान्याविरुद्ध काही विघ्नसंतोषी लोक कोणाच्यातरी सांगण्यावरुन गैरसमज पसरविण्याचे काम करत आहे. हे पूर्णपणे चुकीचे असून गावातील नागरिकांच्या आरोग्याबाबत कोणतीही समस्या निर्माण होण्याची भिती नसल्याचे सांगून बिरोले  म्हणाले, संगमनेर तालुक्यातील काही लोकांनी युटेक शुगर लिमिटेड कारखाना होऊ नये, यासाठी येथील गरीब शेतकऱ्यांना हाताशी धरुन जाणीवपूर्वक कारखाना उभारणीत कायदेशीर अडचणी निर्माण केल्या.

परंतु, शेतकऱ्यांचा पाठिंबा व शेतकरी विकासाचा प्रामाणिक हेतू यामुळेच पहिला गळीत हंगाम चांगल्याप्रकारे सुरु आहे. मात्र, काही लोक जाणिवपूर्वक प्रदूषण व पाणी खराब झाल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याच्या वावड्या उठवत असून प्रशासनाकडे तक्रारी करत आहे. परंतु, अहमदनगर प्रदुषण नियत्रंण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ११ डिसेंबर रोजी युटेक लिमिटेडला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत अहवालात समाधान व्यक्त केले आहे. 

कारखान्याने कोणतेही सांडपाणी ओढ्यात न सोडता २५ लाख खर्च करत त्याचे शुद्धीकरण करुन लगतच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत पाणी पुरवठा सुरु केला आहे. यातून सध्या १०० एकर क्षेत्र हे ओलितीखाली आले असून लवकरच परिसरातील अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळून दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण.
युटेक शुगर लिमिटेड या साखर कारखान्याने कोणतेही दुषित पाणी ओढा अथवा बंधाऱ्यांत सोडले नाही. उलट या सांडपाण्याचे शुद्धीकरण करुन येथील गरीब शेतकऱ्यांच्या शेतीला देण्याचे काम बिरोले यांनी स्वखर्चातून पाईप लाईन करत देण्याचे सुरु केले आहे. उजाड माळरानावर हिरवळ फुलवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल कारखान्याने टाकल्यामुळे येथील शेतकऱ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.