रस्त्यावर चर खोदुन रस्ता बंद करण्याचा महाप्रताप..?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील भाळवणी - गोरेगाव रस्त्या लगत चंभरमाळ वस्ती वर जाण्यासाठी पानंद रस्ता आहे सोमवारी सकाळी या पानंद रस्त्यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने खोल चर खोदुन रस्त्याच्या दोन्ही बाजूला माती तसेच काटेरी झुडपे टाकण्यात आले आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
यावेळी येथील शेतकार्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या, गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचा वापर आम्ही करत आहे आज गवराम शिवराम तांबे यांनी सोमवारी सकाळी रस्त्या मध्ये खोल चर खोदुन लिंबाची झाडे तसेच काटेरी झुडपे रस्त्यावर टाकली आहे आज आम्ही आमच्या वस्तीवर तसेच शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता बंद झाला आहे सात वर्षापुर्वी आम्ही गोरेगाव ग्रामपंचायत पाठपुरावा करुन रोजगार हमी योजना अंतर्गत या रस्त्याचे मुरमीकरण केले होते माञ आज या शेतक-यांनी रस्ता बंद केला आहे. 

या शेतक-यावर गुन्हा या दाखल करावा तसेच हा रस्ता लवकर चालु करावा अशी मागणी शेतक-यांनी केली तसेच हा रस्ता लवकरात लवकर रस्ता चालु करावा अन्यथा तहसिल कार्यालय येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी शेतक-यांनी दिला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

मंगळवार दि 26 तहसीलदार भारती सागरे यांना निवेदन देण्यात आले असून यावेळी उपसरपंच दादाभाऊ नरसाळे, शिवाजी नरसाळे , ग्रा. म सदस्य संपत नरसाळे , जालिंदर नरसाळे , रामदास नरसाळे , रभाजी नरसाळे , शिवाजी नरसाळे, बाजीराव नरसाळे , ज्ञानदेव नरसाळे, बाबा नरसाळे विष्णु नरसाळे, यशवंत नरसाळे संभाजी नरसाळे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.