आगामी काळात काँग्रेस देशात क्रमांक एकचा पक्ष होईल - आ. थोरात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :देशाच्या राजकारणात महत्त्वाच्या ठरलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दमदार वाटचाल करत ५७ वरुन ८० जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस पुन्हा देशात क्रमांक एकचा पक्ष होईल, असा विश्वास माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात व्यक्त केला. यावेळी गुजरातमध्ये काँग्रेसने मिळविलेल्या यशाबद्दल संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आ.थोरात यांचा सत्कार करण्यात आला. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी आ. थोरात यांच्या सत्कार प्रसंगी कार्यकर्त्यांशी बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उपनगराध्यक्ष नितीन अभंग, नगरसेवक दिलीप पुंड, स्वदेश सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमाने, विश्­वास मुर्तडक, नवनाथ अरगडे, अशोक भुतडा, रुपाली औटी, सोनाली शिंदे, किशोर पवार, बाळासाहेब पवार, रिजवान शेख, निखील पापडेजा, रामहरी कातोरे, डॉ.दानिश पठाण, अ­ॅड. सुहास आहेर, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ आदींसह सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, गुजरातची निवडणूक देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठे यश मिळविले. या अर्थाने हा काँग्रेसचा नैतिक विजय असून आगामी काळात काँग्रेस पुन्हा देशात क्रमांक एकचा पक्ष होईल. भाजपच्या फसव्या आश्­वासनांना जनता कंटाळली असून मागील तीन वर्षांत एकही महत्त्वपूर्ण निर्णय झाला नाही. गरीबांना बुरे दिन व उद्योगपतींनाच अच्छे दिन आले असल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आ. डॉ. तांबे म्हणाले, गुजरातची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती काँग्रेसच्या केंद्रीय समितीने गुजरात विधानसभा काँग्रेस उमेदवार निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी महसूलमंत्री आ. थोरात यांची निवड केली होती. ही संगमनेरकरांसाठी मोठी अभिमानाची बाब ठरली. काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी व अध्यक्ष खा. राहुल गांधी यांचा मोठा विश्­वास आ. थोरातांवर असून देशाच्या राजकारणात संगमनेरकरांची मान उंचावली आहे. आ.थोरात यांच्या कामाचा आवाका मोठा आहे.

गोरगरिब व सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते युवक यांच्याबरोबर थेट संबंध आणि राज्याच्या विविध विभागांतील प्रश्­नांचा अभ्यास यामुळे त्यांचे नेतृत्व लोकप्रिय ठरले आहे. राज्यमंत्री मंडळात कृषी, शालेय शिक्षण, पाटबंधारे, खार जमीन, जलसंधारण, रोहयो, राजशिष्टाचार व महसूल या विभागांमधून उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतांना आ.थोरात यांनी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळवून दिले असल्याचेही ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.