दीड हजार किलो गोमांस, चार जिवंत वासरांसह जीप पकडली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहर पोलिसांनी शहरात शनिवारी व रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत दीड हजार किलो गोमांस, चार जिवंत वासरांसह जीप पकडली आहे. एकूण ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील भारतनगर याठिकाणाहून गोमांससह चार जिवंत वासरे असल्याची माहिती गुप्त खबऱ्यामार्फत पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांना समजली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शनिवारी (दि.२३) रात्री ७.३० वाजेच्या सुमारास छापा टाकला. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
या छाप्यात आठशे किलो गोमांस व चार जिवंत वासरे पकडली आहे. एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक बाळासाहेब अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वसीम अब्दुल करीम कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
रविवारी (दि. २४) रात्री आठ वाजेच्या सुमारास मोबीन हसन शेख (रा.कुर्ला, मुंबई) व गुफरान नासीम कुरेशी (रा.मदीनानगर, संगमनेर) हे जीप (क्र. एमएच १६ ई ६८४४)मधून बेकायदेशीररित्या सातशे किलो गोमांस भारतनगर ते जोर्वे नाक्यामार्गे घेवून जात असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. 

पोलिसांनी त्या ठिकाणी जावून ही जीप पकडली. एकूण २ लाख २० हजार रुपयांचा हा मुद्देमाल आहे. दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य हवालदार अण्णा वाघ व पोलीस नाईक रामनाथ सानप हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.