कोपरगाव तालुक्याचा १०० कोटींचा निधी कुठे हरवला ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था पाहता १०० दिवसात १०० कोटी निधी आणल्याच्या घोषणा या वल्गना ठरल्या असून १०० कोटी सोडा एक कोटीचासुद्धा निधी आणल्याचे दिसत नसल्याने हा निधी हरवला तर नाही ना? असा सवाल चांदेकसारे बाजारतळ सुशोभिकरणाच्या कामाच्या शुभारंभी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आशुतोष काळे यांनी केला. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
चांदेकसारे बाजारतळाच्या सुशोभीकरणासाठी कृषी व पणन महामंडळाने २५ लाख रुपये निधी ग्रामपंचायतीला दिला. त्याचा शुभारंभ काळे यांच्या हस्ते करण्यात आला. ते म्हणाले, आज तालुक्यातील रस्त्यांची अवस्था रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते अशी झाली आहे. टोलनाका होता तेंव्हा झगडे फाटा- वडगावपान रस्ता बरा होता असे म्हणण्याची वेळ आली आहे. सत्ताधारी असूनही त्यांना निधी मिळविण्यात अपयश आल्याची टिका त्यांनी केली.

समृद्धी महामार्गाच्या बाबतीत काही शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून त्यांच्या जमिनीचा त्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही. त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करून त्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत चांदेकसारे गावासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या बंधाऱ्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला असून या कामालासुद्धा लवकरच सुरुवात होणार असल्याचे काळे यांनी सांगितले.चांदेकसारे बाजारतळाचे संपूर्णपणे सुशोभिकरण करण्यात येणार असून यामध्ये ५० बाय १२ फुटाचे नवीन चार ओटे, संपूर्ण जुन्या व नवीन ओट्यावर पेव्हींग ब्लॉक बसविण्यात येणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी ५००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय व संपूर्ण बाजारतळ परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यात येणार आहे. 

हे काम तीन महिन्याच्या आत पूर्ण होणार आहे.या कामाच्या शुभारंभप्रसंगी सभापती अनुसया होन, काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, काकासाहेब जावळे, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, राहुल रोहमारे, माजी सरपंच मतीन शेख, लाला होन, भीमा होन, नूरमहंमद शेख, भैया सय्यद, गोकुळ गुरसळ, पंकज पुंगळ, शंकर चव्हाण, युनुस शेख, दगू होन, भास्कर होन, चंद्रकांत होन, दादासाहेब होन, द्वारकानाथ होन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन नारायण होन यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.