आगे कुटुंबाला सरकारकडून संरक्षण मिळवून देवू- ना.विखे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नितीन आगे खून प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आपण व्यक्तीगत पाठपुरावा करू आणि आगे कुटुंबाला सरकारकडून संरक्षण मिळवून देवू, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रिपाइंच्या शिष्टमंडळाला दिली.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे याची २८ एप्रिल २०१४ रोजी हत्या झाली होती. या घटनेतील आरोपींची नुकतीच निर्दोष मुक्तता झाली. साक्षीदार फितूर झाल्यामुळेच आरोपी निर्दोष सुटल्याची भावना आठवले गटाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची आहे. 

यासंदर्भात जिल्हा सरचिटणीस रमेश पारधे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची भेट घेऊन या घटनेचा सीआयडीमार्फत पुन्हा तपास करून आरोपीवर कडक कारवाई करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन दिले. फितूर झालेल्या साक्षीदारांना सहआरोपी करावे. नितीन आगे याच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे, आशी मागणी देखील शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावनाच आपण मुख्यमंर्त्यांकडे पोहचू अशी ग्वाही देतानाच या घटनेचा तपास सीआयडी मार्फत पुन्हा तपास सुरु करतानाच आगे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी व्यक्तीश: पाठपुरावा करू, आगे कुटुंबाला संरक्षण देण्याबाबतही सरकारला निर्णय करण्यास भाग पाडू, असे आश्वासन शिष्टमंडळाला त्यांनी दिले.

शिष्टमंडळात रमेश अशोक पारधे, किरण आहेर, रिपाइंचे लोणी शहराध्‍यक्ष संतोष पारखे, आण्‍णा ब्राह्मणे, भावेश ब्राह्मणे, सुहास ब्राह्मणे, सचिन माघाडे, देविदास पवार, संतोष शिंदे, अक्षय पवार, मयूर वाघमारे, अक्षय गुजर, आकाश जाधव, प्रमोद थोरात, ऋषिकेश वाकचौरे, दीपक शिरसाठी आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.