जामखेडकरांना नवीन वर्षाची भेट.कृषी महाविद्यालयाच्या इमारतीच भूमीपुजन १ जानेवारी रोजी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील हाळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचा भूमीपुजन कार्यक्रम १ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.हा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व पालकमंत्री ना.प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
या पार्श्वपाभूमीवर पालकमंत्री ना.प्रा.राम शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हा कृषी अधीक्षक लोणारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्यासह संबंधित अधिकारी व राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी कृषी महाविद्यालयाच्या नियोजित जागेसह,भूमीपूजन समारंभाचे नियोजित सभास्थळ , हेलिपॅड व वाहनतळाची पाहणी केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मागील वर्षी हाळगावला सरकारी कृषी महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर या महाविद्यालयावर श्रीगोंदेकरांनीही हक्क दाखविल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या कृषी महाविद्यालयाबाबत जनतेमध्ये तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र पालकमंत्री ना.शिंदे यांनी प्रतिष्ठापणाला लावून तालुक्यात कृषी महाविद्यालय आणून मतदारसंघाच्या वैभवात भर टाकली आहे. या कृषी महाविद्यालयास ६० विद्यार्थी संख्या तर ६५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मंजूर आहेत. 

इमारत बांधकामासाठी व अन्य व्यवस्थापन खर्चासाठी तब्बल ६५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी १३ कोटी रूपये वर्ग झाले आहेत. हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. या कृषी महाविद्यालयासाठी १०० एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. या भूमीपूजन कार्यक्रमास तालुक्यातून मोठ्या संख्येने लोक नागरिक उपस्थीत राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२५) पालकमंत्री ना.शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.