सिद्धीबागेच्या दुरावस्थेवर गांधींकडून मनपा 'टार्गेट'.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगरची सिद्धीबाग ही शान होती. थोरा मोठ्यांचे आकर्षण असलेल्या सिद्धीबागेची मनपाच्या दुर्लक्षामुळे आवस्था अत्यंत दैयनीय झाली आहे. आता सिद्धीबागेकडे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष घातल्यामुळे काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. सिद्धीबागेला नवे स्वरुप यावे, मुलांना नवीन खेळण्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी खासदार निधीतून व उपमहापौरांच्या माध्यमातून सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीतर्फे सिद्धीबागेत स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. खासदार गांधी यांनी यावेळी महापालिका प्रशासनाला चांगेलच 'टार्गेट' केले.

खासदार गांधी म्हणाले, सिद्धीबागेच २६ जानेवारीपर्यंत रुप बदलण्याचा प्रयत्न असणार आहे.' माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून सुधारणा दिवस पाळत आहे. या निमित्त सिद्धीबागेत विशेष स्वच्छता अभियान राबविल्याचे त्यांनी सांगितले. खासदार गांधी यांनी मनपा शहर अभियंता आर.जी.सातपुते, उद्यान निरीक्षक किसन गोयल यांना सिद्धीबागेच्या झालेल्या दुरावस्थेवरून चांगले धारेवर धरले व तातडीने सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्या..
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भारतीय जनता पक्षातर्फे भरगच्च सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. उपमहापौर श्रीपाद छिंदम, गटनेते सुवेंद्र गांधी, सरचिटणीस किशोर बोरा, उपाध्यक्ष किशोर डागवाले, नगरसेविका मालन ढोणे, मध्यमंडल अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, भिंगार मंडल अध्यक्ष शिवाजी दहिहंडे, प्रशांत मुथा, वंदना कुसळकर, कालिंदी केसकर, लिला अगरवाल, नाना भोरे, सागर गोरे आदिंसह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सिद्धीबागेत बहुपयोगी लक्ष्मीतरु, नारळ व इतर शोभवंत फुल झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.