तारकपूर बस स्टॅंडवरून 4 लाखांची चारचाकी चोरीस.




अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तारकपूर बसस्थानकावरून 4 लाखांची चारचाकी चोरल्याची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, फिर्यादी प्रवीण महादू खेडकर (रा. पानोडी, ता. संगमनेर, जि.अ.नगर) यांची महिंद्रा कंपनीची 4 लाख रुपये किमतीची फोर व्हीलर आरोपी शिवाजी भाऊसाहेब खेडकर (रा. सदर, भिंगार) याने चोरून नेल्याप्रकरणी आरोपीविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमधून पोलीस प्रशासनाविषयी नाराजीचा सूर उमटत असून पोलीस बंदोबस्ताची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.