मला आमदार करण्यात आ. कर्डिलेंची मोठी मदत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप- शिवसेनेबरोबरच इतर पक्षांतील आमदारांची मते मिळवून देण्याचे काम नगर जिल्ह्याचे राजकीय मास्टर आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केल्यामुळेच माझ्या मतांची संख्या वाढली असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रसाद लाड यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे माजी आ. कै. बाबूराव भापसे यांच्या पंचविसाव्या पुण्यतिथीचे औचित्य साधत आ. प्रसाद लाड यांचा हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्थेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. शिवाजीराव कर्डिले होते. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
या वेळी आ. लाड म्हणाले, नगर जिल्हा राजकारणाची पंढरी असून, या जिल्ह्यातील निंबोडी, ता. पाथर्डी ही माझी सासुरवाडी असल्यामुळे मला बरच काही राजकारण शिकण्याची संधी मिळत आहे. पाथर्डी तालुका दुष्काळी आहे, त्यामुळे या तालुक्याच्या विकासासाठी आपण भरीव निधी देऊ, अशी ग्वाही आ. लाड यांनी दिली. 

आ. कर्डिले म्हणाले माजी आ. कै. बाबूराव भापसे निर्भीड व्यक्तिमत्व होते. तर माजी आमदार गणपतराव म्हस्के अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून जिल्ह्याला परिचित होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजयेयी यांचा वाढदिवस तसेच नाताळचा प्रवित्र सण या दिवसाचे औचित्य साधत आ. प्रसाद लाड यांचा या निमित्ताने सत्कार आयोजित केला, ही निश्चितच आनंदाची बाब असून, आ. लाड यांच्या आमदारकीचा निश्चितच पाथर्डी तालुक्याच्या विकास कामांसाठी फायदा होईल. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

या वेळी सरपंच रामकिसन वांढेकर, उपसरपंच फिरोज पठाण, मनोज ससाणे, रवींद्र भापसे, कुंडलिक मचे, शरद शेंदूरकर शिवाजी मचे, अरुण शिंदे, अविनाश कारखेले, पोपटराव बुधवंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक हुतात्मा बाबू गेणू शिक्षण संस्थेचे विश्वस्त कुशल भापसे यांनी केले. सूत्रसंचालन नगरचे प्रसिद्ध निवेदक उध्दव काळापहाड यांनी केले. विश्वस्त आणि आदर्श शिक्षिका संगीता भापसे यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.