मला समाजकारणातून उठविण्याचा विरोधकांचा प्रयत्न : आहुजा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव पोलीस ठाण्यातील पो.नि.गोविंद ओमासे यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली. या अन्यायाच्याविरोधात शेवगाकरांनी बंद पाळून अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केल्याने माझ्या पक्षांतर्गत विरोधकांनी एका महिलेमार्फत माझ्याविरुध्द खोटा गुन्हा दाखल केला. अशाच प्रकारे खोटा गुन्हा दाखल करून आपणही प्रत्युत्तर देऊ शकलो असतो. मात्र, खालच्या पातळीवरील असे राजकारण करून शेवगावची राजकीय, सामाजिक घडी विस्कळीत करण्याची आपली मनोवृत्ती नाही. त्यामुळे माझी बदनामी व खोटे गुन्हे दाखल करून मला सार्वजनिक जीवनातून उठविण्याचा निंदनिय प्रयत्न होत असला तरी, सत्य एक दिवस जनतेसमोर निश्चितपणे उघड होईल, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक अशोक आहुजा यांनी केले. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शेवगाव येथे नव्याने बदलून आलेले पो.नि. गोविंद ओमासे यांनी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी भाजपचे येथील जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक अशोक आहुजा यांच्यावर केलेल्या अन्यायाच्याविरोधात सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या शेवगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. मिळून ओमासे यांच्या बदलीची मागणी करण्यात आली होती. 

त्यानंतर भाजपच्या दुसऱ्या गटातील पदाधिकाऱ्याने काही जणांना हाताशी धरून अधिकाऱ्याच्या विरोधात एकतर्फी कारवाई करू नये, यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. पाठोपाठ एका महिलेने आहुजा यांच्याविरोधात दमबाजी केली व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना अशोक आहुजा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

या वेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, सरचिटणीस सुनील रासने, भीमराज सागडे, ओबीसी मोर्चाचे संजय शिंदे उपस्थित होते. आहुजा म्हणाले की, अवैध धंद्यांविरोधात पो.नि.ओमासे यांनी शेवगावात उघडलेल्या मोहिमेमुळे मी त्यांच्याशी वाद घातला, असा अपप्रचार पक्षांतर्गत विरोधकांनी चालविला. मात्र, गेल्या २५ ते ३० वर्षांच्या काळात आपण पोलीस अधिकाऱ्यांची मानमर्यादा सांभाळून सर्वसामान्य जनतेचे लहान -मोठे प्रश्न सोडविले असल्याचे शहर व तालुक्यातील जनतेला माहीत आहे. 

परंतु माझ्याविरुध्द कुभांड रचून मला समाजकारणातून संपविण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी, मी माझा वसा सोडणार नाही. आजच्या या घटनेला शांतीतून क्रांती घडविण्याच्या मार्गाने उत्तर देण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही आहुजा यांनी नमूद केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.