श्रीगोंद्यात जमिनीच्या वादातून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील रहिवाशी राजेंद्र संभाजी गायकवाड (वय ४५)यांना दि.१८ डिसेंबर रोजी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास शेतजमिनीच्या वादातून त्यांच्याच नातेवाईकांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.या प्राणघातक हल्ल्यात गायकवाड गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे त्यांनी दि.२५ रोजी याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चार आरोपींविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत माहिती अशी की, राजेंद्र गायकवाड हे शिरसगाव बोडखा येथील रहिवासी असून, त्याठिकाणी ते शेती करतात. परंतु त्यांच्या काही नातेवाईकांत व त्यांच्यात शेतीच्या बांधावरून व शेतजमिनीची लेव्हलिंग करण्याच्या कामावरून मोठा वाद आहे. त्या वादातूनच दि.१८ डिसेंबर रोजी गायकवाड यांचे नातेवाईक असलेले राहुल बाळासाहेब निंबाळकर, सोमनाथ बाळासाहेब निंबाळकर, चतुराबाई बाळासाहेब निंबाळकर, ज्योतिराम बाळासाहेब काळे (सर्व रा. शिरसगाव बोडखा) यांनी राजेंद्र गायकवाड यांना रस्त्यात अडवून त्यांच्या वाहनास वाहने आडवे लावून त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात लोखंडी टॉमीने मारले व त्यांना गंभीर जखमी केले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

तसेच गायकवाड यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली या हल्ल्यातून गायकवाड हे बालंबाल बचावले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे गायकवाड यांनी वरील चारही आरोपींविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.