प्रेस क्लबचे सामाजिक पत्रकारिता पुरस्कार जाहिर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्रेस क्लब व हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने दिले जाणारे पत्रकारिता पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे. शनिवार दि.06 जानेवारी रोजी पत्रकार दिनी मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी दिली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पत्रकार दिनी दरवर्षी नगरमधील नऊ पत्रकारांना प्रेस क्लबच्या वतीने हे पुरस्कार दिले जात असून, पुरस्कार देण्याचे हे सहावे वर्ष आहे. पत्रकार, वृत्तवाहिनी प्रतिनिधी व वृत्तछायाचित्रकार यांचे पत्रकारितेतील योगदान लक्षात घेवून, निवड समिती हे पुरस्कार जाहिर करत असते. या पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारचे प्रस्ताव व अर्ज मागविले जात नसून, संवेदनशीलपणे काम करणार्‍या पत्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. 5 हजार रु. रोख, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

शनिवार दि.06 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी 5:30 वा. टिळक रोड, तुषार गार्डन येथे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शकूर शेख यांनी केले आहे.

सदरील पुरस्कार पुढील प्रमाणे सामाजिक पत्रकारिता पुरस्कार 
मिलिंदकुमार साळवे, ज्ञानेश्‍वर निमसे, बंडू पवार, दत्ता इंगळे, विकास अंत्रे, ज्ञानेश दुधाडे, शोधपत्रकारिता पुरस्कार- संदिप कुलकर्णी, इलेक्ट्रॉनिक मिडिया पुरस्कार- सचिन शिंदे, वृत्तछायाचित्रकार पुरस्कार- वाजिद शेख.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.