नगरच्या भेटीला येतोय अमेय आणि त्याचा ‘अमर फोटो स्टुडियो’

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मनोरंजन हा शब्द जितका हलका-फुलका आहे, तितकंच त्याला अनुभवणं देखील मजेशीर आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी माध्यमं म्हणजे नाटक, मालिका, चित्रपट आदी. नेहमीच्या त्याच-त्याच गोष्टींतून थोडासा वेळ काढून अनेकजण त्यांच्या मनोरंजनासाठी नाटक, मालिका, चित्रपट आवर्जुन पाहतात. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
सध्या आपल्या मराठी मनोरंजनसृष्टीत पण विविध विषय नाटक, चित्रपटांच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. एखाद्या गोष्टीत जरा काही आगळं- वेगळं असेल तर प्रेक्षकांचे लक्ष पहिले त्या गोष्टीकडे जाते, याचाच अर्थ असा की प्रेक्षकांना देखील मनोरंजनाच्या माध्यमातून काहीतरी नवीन अपेक्षित असतं आणि प्रेक्षकांची ही अपेक्षा पूर्ण केली आहे ‘अमर फोटो स्टुडियो’ या मराठी नाटकाने.

‘गरज असते तेव्हाच दिसतो’, असे वाक्य नाटकाच्या शीर्षका अगोदर लिहिले आहे आणि हेच वाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. स्टुडियो आहे म्हणजे फोटोशूट असणार, पण गरज असते तेव्हाच का दिसतो हा स्टुडियो... खरं तर हेच गुपित आहे या ‘अमर फोटो स्टुडियो’ नाटकाचे. 

हे गुपित आता महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना कळणार आहे कारण ‘अमर फोटो स्टुडियो’ या नाटकाचा महाराष्ट्र दौरा सुरु झाला आहे. महाडपासून सुरु झालेल्या या नाटकाचा दौरा २६ डिसेंबरला अहमदनगरमध्ये येणार आहे. सर्वांचा लाडका अभिनेता अमेय वाघदेखील या नाटकाच्या निमित्ताने अहमदनगरमध्ये येणार आहे. 

अमेय वाघने ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दिल दोस्ती दोबारा’ या मैत्रीवर आधारित मालिकेत मित्राची मजेशीर आणि खास भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. त्यानंतर अमेय वाघच्या ‘मुरांबा’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘फास्टर फेणे’ या चित्रपटांनी प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळवली. 

प्रत्येकाला आवडेल असा सहज, सुंदर अभिनय करुन अमेय वाघ हा प्रेक्षकांचा फेव्हरेट बनला. आता ‘अमर फोटो स्टुडियो’च्या निमित्ताने अमेय वाघ अहमदनगर मध्ये येणार म्हणजे ही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाचीच बातमी असेल.२६ डिसेंबरला माऊली नाट्यगृह येथे रात्री ९:३० वाजता अमेय वाघ आणि ‘अमर फोटो स्टुडियो’ नगर मधील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

सुनील बर्वे सादर करत असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केले असून या नाटकाची कथा मनस्विनी यांनी लिहिली आहे. तसेच अमेय वाघसह, सुव्रत जोशी, सिध्देश पुरकर, सखी गोखले आणि पूजा ठोंबरे या कलाकारांनी देखील दमदार भूमिका साकारल्या आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.