जिल्ह्यात १ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीत जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार ४९९ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी १ लाख ५२ हजार जणांसाठी ४७१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १ लाख ३७ हजार ३५५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४१८ कोटी रुपये वर्ग झाले असून संगमनेर तालुक्यात तीन टप्प्यांमध्ये १२ हजार १८० शेतकऱ्यांना १९ कोटी ८६ लाख ८६ हजार ३१८ रुपयांच्या कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शहरातील जाणता राजा मैदानावर माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी व संगमनेर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या कृषी एक्स्पो २०१७चे उद्घाटन पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ना. शिंदे म्हणाले, मागेल त्याला शेततळे, या योजनेंतर्गत जिल्ह्याला ९ हजार २०० शेततळी करण्याचा कृषी विभागाला लक्षांक दिला होता; मात्र जिल्हा कृषी विभागाने लक्षांकापेक्षा जास्त ११ हजार शेततळी तयार करण्यासाठीचा निधी खेचून आणण्यात यशस्वी झाले. त्यापैकी ६ हजार ५०० शेततळी पूर्ण झाली असून ५०० प्रगतीपथावर आहेत. उर्वरित पावसामुळे प्रलंबित आहेत. या उन्हाळ्यात सर्व ११ हजार शेततळी पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. 

कर्जमाफीबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते नको ते आरोप करत आहेत. परंतु मागील सरकारच्या काळातील कर्जमाफीच्या तुलनेत या सरकारने शेतकऱ्यांना केलेली कर्जमाफी अतिशय सकारात्मक व विनासहाय्य केलेली आहे. मागील काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारच्या काळात कर्जमाफीची घोषणा झाली. मात्र त्यामध्ये गैरप्रकार झाला. त्यामुळे ती कर्जमाफी कोणाला मिळाली व कशी मिळाली याची कुठल्याही प्रकारची यादी अद्यापही ना राज्य सरकारकडे ना केंद्र सरकारकडे आहे. 

मागील सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी तब्बल १८ महिन्यांचा कालावधी लागला. परंतु सध्याच्या राज्य सरकारने अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीतच ऑनलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग केली असून शेतकऱ्यांच्या हिताचे व त्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. मागील सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात विजेचे भारनियमन होत होते. परंतु या सरकारच्या काळात विजेचे भारनियमन पुर्णपणे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारने जमिनीची आरोग्यपत्रिका काढून घेण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. 

माती परिक्षण करून १ लाख २० हजार ५४ आरोग्यपत्रिका शेतकऱ्यांना उपलब्ध दिल्या आहेत. जलसंधारण खाते आपल्याकडे आल्यानंतर संपूर्ण राज्याचा दौरा करुन जसे परिक्षेचे वेळापत्रक तयार केले जाते. तसेच जलयुक्तचे वेळापत्रक तयार करुन राज्याबरोबर जिल्ह्यात जलयुक्तची मोठ्या प्रमाणात कामे केली. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरविण्यातही आले असून जलयुक्त शिवाराची कोणत्या ठिकाणी किती कामे झाली आहेत व सुरु आहेत हे सुद्धा ऑनलाईन समजत आहे. 

अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम राज्य सरकार करत आहे. अनेक योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सरकारने केले आहे. परंतु या योजनांच्या बाबतची मार्केटींग करण्यात राज्य सरकार कमी पडत असल्याची खंत व्यक्त करुन सरकारने राबविलेल्या योजना सर्वसामान्य व शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आता शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती न करता आधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान वापरुन कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती करावी. यासाठी कृषी प्रदर्शने होणे काळाची गरज आहे. या कृषी प्रदर्शनाचा परिसरातील शेतकऱ्यांनी पुरेपुर लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.