वाघुंडे शिवारातील अपघातात चारजण जखमी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मालट्रकने मिनीबसला पाठीमागून ज़ोराची धडक दिल्याने तीन विद्यार्थ्यांसह ४ जण जखमी झाले. हा अपघात पारनेर तालुक्यातील नगर -पुणे महामार्गावर वाघुंडे शिवारात दि.२३ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास घडला. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत मिळालेली माहिती अशी- दि.२३ रोजी वाघुंडे शिवारात मिनीबस ( क्र. एम.एच. १६ बी.एस. १०७ ) ही वाघुंडे गावाकडे वळत असताना पुणे -नगर महामार्गावरून जाणाऱ्या एम. एच.१६ ए. ई. या मालट्रकने मिनीबसला पाठीमागून जोराची धडक दिली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या वेळी झालेल्या अपघातात मिनीबसमधील ओम सचिन शिवळे (वय - ८), विश्वजित महेंद्र कातोरे (वय -३), सूरज संदीप कुलट (वय - ३) सर्व रा. कामरगाव, ता. नगर व चंद्रकांत फलके (वय - ३४), रा . अहमदनगर हे जखमी झाले. याप्रकरणी बसचालक संदीप विठ्ठल गवळी (वय २९), रा. आपधूप यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ. वनाजी धामणे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.