पूर्वी व आताही शिवसेनेमुळेच विकासकामे : महापौर कदम.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :निर्मल चेंबर्स मागील भागात पाणी साठत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. हे काम आता मार्गी लागत आहे. गरज असेल तेथे निधी उपलब्ध करून देत त्यांनी प्रभागात विविध विकासकामे केली आहेत. शहराच्या विकासाला आता खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. हे चालना देण्याचे काम पूर्वी व आता शिवसेनेनेच केल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी सांगितले. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
लालटाकी, निर्मल चेंबर्स (प्रभाग १६) येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. सभागृहनेते गणेश कवडे, नगरसेविका जयश्री सोनवणे, छाया तिवारी, सुरेश तिवारी, नारायण सुरपुरिया, द्वारका जगताप, नारायण मिश्रा, रामकिसन जाधव, शेखर राणा, शेख अलीम, विशाल गायकवाड, रमेश गायकवाड, राजू नन्नवरे, बाळासाहेब सोनवणे, अजय शिंदे, राहुल चांदणे, योगेश शिंदे, भाऊ घोरपडे उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सभागृहनेते गणेश कवडे यांनी 'मनपाची परिस्थिती बिकट असून, अशा परिस्थितीतही शहरात गरज असेल तेथे विकासकामे केली जात आहेत.' विविध मार्गांनी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शासन दरबारी विविध योजनांसाठी पाठपुरावा सुरू असून, त्यातील काही योजनांची कामे आता सुरू होत आहेत, असे सांगितले. नगरसेविका जयश्री सोनवणे यांनी महापौर सुरेखा कदम यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. प्रभागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्याचे त्यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.