लालूनंतर कन्या मिसा भारतीही ईडीच्या कचाट्यात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात विशेष न्यायालयाने शनिवारी दोषी ठरविले. मात्र त्याचवेळेस त्यांच्या कन्या मिसा भारती या अंमलबजावणी संचालनालय म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेटच्या (ईडी) कचाट्यात सापडल्या आहेत.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
हवाला व्यवहाराच्या एका प्रकरणात ईडीने मिसा भारती यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

मनी लॉन्ड्रिंगच्या या प्रकरणात ईडीने मीसा व त्यांचे पती शैलेश यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 8 जुलै रोजी धाडी टाकल्या होत्या. धाडी टाकलेल्या जागांमध्ये इंदिरा गांधी विमानतळाजवळील त्यांचे बिजवासन फार्महाउस, सैनिक फार्म आणि घिटोरनी येथील घरे यांचा समावेश होता.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
बीरेंद्र जैन आणि सुरेंद्र कुमार जैन या दोन व्यावसायिक बंधूंच्या पैशांचा हवाला व्यवहार करण्याचा आरोप मिसा भारती यांच्यावर आहे. मे महिन्यात याच आरोपावरून ईडीने मिसा भारती यांचे चार्टर्ड अकाउंटेंट राजेश अग्रवाल यांना अटक केली होती. सध्या जैन बंधू तुरुंगात असून अनेक प्रतिष्ठित लोकांचे काळे पैसे पांढरे करून देण्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.