मेंढपाळास मारहाण करत जीवे मारण्याची धमकी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथे शुक्रवारी एका मेंढपाळास मारहाण करत मेंढीच्या एका कोकराला दगड मारून त्याला ठार केल्याची घटना घडली आहे. या आरोपी विरोधात सदर मेंढपाळाणे श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर असे की, सत्तू हिरा तालवर (रा.पाटस ता.दौंड, जि.पुणे) हे शुक्रवार दि.२२ रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी गावच्या शिवारात गणेशावरून मेंढ्या घेऊन जात होते. यावेळी बापू भुजबळ (रा. आनंदवाडी) हा दारू पिवून तेथे आला व त्याने तालवर यांच्या मेंढ्यांना दगड मारून, त्यांना विनाकारण शिवागाळ करू लागला. 

त्यावर तालवर यांनी आमचे मेंढ्यांना दगड का मारता. असे विचारले असता. त्याचा राग येऊन भुजबळ याने आमच्या येथे मेंढ्या चारु नका, असे म्हणून एका कोकराला डोक्यात दगड मारून त्याला ठार मारले. तसेच मेंढपाळ तालवर यांच्या डोक्यात दगड मारला त्यात त्यांचे डोके फुटले आहे. तसेच त्यांना भुजबळ याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून त्यांची पत्नी व मुलाला देखील त्याने दमदाटी केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तसेच मेंढ्या येथून घेऊन जा नाहीतर तुझ्या मेेंढ्यासह तुला जीवे ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे मेंढपाळ सत्तू तालवर यांनी कोकराला दगड डोक्यात घालून जागीच ठार मारले. तसेच त्यांना मारहाण करून जबर दुखापत करणे. 

याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपी बापू भुजबळ (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान मेंढ्या चारण्यासाठी अशा गावोगावी फिरणाऱ्या या मेंढपाळांना स्थानिक लोकांकडून अनेकदा दमदाटी केली जाते. परंतु अशा प्रकारे एका मुक्याजीवाचा क्रूरतेने जीव घेतल्यामुळे या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.