भाजप जिल्हा उपाध्यक्ष आहुजा यांच्यासह सहा जणांविरुध्द गुन्हा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महिला व तिच्या पतीला धमकी दिल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व नगरसेवक अशोक आहुजा यांच्यासह सहा जणांविरुध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अशोक आहुजा यांच्यासह अजय गाढेकर, मीनाबाई गाढेकर, सरला लद्दे, बाळासाहेब लद्दे सर्व रा. शेवगाव व प्रदीप पवार रा. औरंगाबाद. यांच्यावर गुन्हा दाखल आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत इंदिरा सुधीर बाबर रा. माळीगल्ली, शेवगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१६ डिसेंबर २०१७ रोजी सायं. ४ च्या सुमारास आरोपींनी गैरकायद्यायची मंडळी जमवून मला शिवीगाळ व धक्काबुकी करून तुमच्या सर्व परिवारास संपवून टाकू, अशी धमकी दिली. 

त्यानंतर मी तक्रार देण्याकरिता शेवगाव पोलीस ठाण्यात गेले असता, अशोक आहुजा यांनी मला व माझे पती सुधीर बाबर यांना शिवीगाळ करून तुमच्यावर खोटी केस दाखल करील व दोघा नवरा-बायकोला जेलमध्ये टाकीन, अशी धमकी दिली. या फिर्यादीनुसार आहुजा यांच्यासह इतर आरोपींवर भादंवि कलम १४३, ५०४, ४५२, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. सुधाकर दराडे करत आहेत. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दरम्यान, याच प्रकरणावरू श्री. आहुजा यांच्या समर्थनार्थ भाजप व इतर पक्षांतील कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शेवगाव शहर बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन केले होते. तर दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक ओमासे यांच्यावर एकतर्फी कारवाई करू नये, असे निवेदन जिल्हा पोलीसप्रमुखांना दिले होते. त्यामुळे शहरात हा जोरदार चर्चेचा विषय झाला होता. आता याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.