मैत्रेय ग्राहक व प्रतिनिधींचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बंद पडलेल्या मैत्रेय कंपनीत अडकलेला ग्राहकांचा पैसा (परतावा) मिळण्याच्या मागणीसाठी मैत्रेय उपभोक्ता एवम अभिकर्ता असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा संपर्क प्रमुख सतीश पाटील, कल्पना वखरे, रमेश तावरे, बाळासाहेब वाघ, मच्छिंद्र निकम, निला शिंदे, बाळासाहेब आडसळे, संदीप बनकर, युनुस शेख, वंदना खेतमाळीस, वर्षा डांगे, रेहाना खान, निलेश वाणी, गौतम महाजन, मीरा केदार आदिंसह जिल्ह्यातील प्रतिनिधी व ग्राहक सहभागी झाले होते. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यात मैत्रेय कंपनीच्या संचालकांनी आर.डी. व एफ.डी. स्वरुपाच्या (4, 5, व 6 वर्षा) कालावधीच्या योजनामध्ये व्याजाचे अमीष दाखवुन जवळपास जिल्ह्यातील कोपरगाव, श्रीरामपूर, अहमदनगर, संगमनेर या चार कार्यालयाच्या माध्यमातून 150 कोटी पर्यंन्तच्या ठेवी जमा केल्या. तसेच मैत्रेय कंपनीने 18 वर्षात चार वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने पैसा गोळा केले. दि.5 फेब्रुवारी 2016 पासून कंपनी बद असून, सध्या कंपनीचे महाराष्ट्रातील सर्व कार्यालय बंद अवस्थेत आहे. ग्राहकांनी गुंतवणुक केलेल्या ठेवीची मुदत संपुनही त्यांचे परतावे त्यांना परत मिळाले नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

या प्रकरणी कंपनीवर नाशिक येथे गुन्हा दाखल होवून, जिल्हा न्यायालय व नाशिक पोलिसांनी योग्य कारवाई करुन तेथील ग्राहकांना परतावे मिळून देण्यासाठी महत्त्वाची भुमिका बजावली. नाशिकच्या धर्तीवर अहमदनगर जिल्ह्यातील ग्राहकांचे मैत्रेय कंपनीत अडकलेले हक्काचे व कष्टाचे पैसे (परतावे) मिळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना देण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.