दुसऱ्या लग्नास नकार दिल्याने घरातील साहित्य पेटविले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कुरण येथील असलम गुलाब हुसेन शेख यांनी अजल असलम शेख यास दुसऱ्या लग्नाची परवानगी दिली नाही, म्हणून अजल याने राग अनावर झाल्याने घरातील कपाट, पलंग, भांडी व गादी घराबाहेर फेकून देत गादीवर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना गुरुवार दि. २१ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये एकूण ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, असलम शेख हे कुरण येथे राहातात. अजल शेख याला दुसरे लग्न करायचे म्हणून त्याने असलम यांच्याकडे परवानगी मागितली होती. पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे अजल याला राग अनावर झाला. म्हणून त्याने रागाच्या भरात घरातील कपाट, पलंग, भांडी, गादी घराबाहेर फेकून दिले व रॉकेल ओतून घरातील गादी पेटवून दिली. .
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

याप्रकरणी असलम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अजल शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विजय खंडीझोड हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.