आशा कर्मचाऱ्यांना लवकरच दीड हजार पगार मिळणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आशा कर्मचाऱ्यांना लवकरच दीड हजार पगार मिळणार असल्याची ग्वाही आरोग्यमंर्त्यांनी दिल्याची माहिती ॲड. सुधीर टोकेकर यांनी दिली.याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात श्री. टोकेकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य आयटक या देशव्यापी संघटनेतर्फे सोमवार दि.१८ रोजी आयटक संलग्न २५ हजार कर्मचाऱ्यांचा मोर्चा चाचा नेहरु बालभुवन उद्यानापासून ते सिताबर्डी पर्यंत नेण्यात आला. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
यामध्ये ५० टक्के महिला आशा गटप्रवर्तक व अंगणवाडी या महिलांची लक्षणीय संख्या होती. एवढा मोठा प्रचंड मोर्चा पहिल्यांदाच गेल्यामुळे व एकत्रित मोर्चा असलेमुळे नागपूर शहर मोर्चाच्या निनादामुळे गजबजला होते.
पोलिसांकडून मोर्चा प्रचंड असल्याचा रिपोर्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे गेल्यावर त्यांनी मोर्चाचे व राज्याचे ५ प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले व सविस्तर सर्व प्रश्नांवर चर्चा करुन सकारात्मक चर्चा केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

राज्य आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांना राज्य उपाध्यक्ष आशा व गटप्रवर्तक संघटनेचे कॉ. राजु देसले, विनोद जोडगे यांनी निवेदनही दिले व त्यांनी स्पष्ट केले की, सन २०१८ ला मुंबईत मिटींग होणार आहे व यावेळी आशा कर्मचाऱ्यांना जी रु. १५०० मानधन देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे ग्रामीण भागामध्ये घरोघरी आरोग्य सेवा देणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांना रुपये १५०० शासकीय मानधन मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे. 

त्यामुळे दि. १८ रोजी प्रचंड मोर्चा नागपूर विधानभवनावर नेल्याचे फलित नक्कीच मिहणार असल्याचे श्री. टोकेकर यांनी म्हटले आहे. हा प्रश्न न सुटल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरु करणार असल्याचे शमा सय्यद, व्दारका राऊत, निर्मला खोडदे, मंगल नगरे, शारदा काळे, सुवर्णा थोरात, नंदा शिंदे, सुवर्णा हजारे, यमुना दौंड, कॉ. भगवान गायकावाड, कॉ. सुभाष लांडे यांनी या पत्रकाव्दारे सांगितले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.