'तो' आरोप भिंगार काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगलट.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  भिंगार बस स्थानक परिसरात अनैतिक व्यवसाय चालतात हा आरोप भिंगार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले. हे वाक्य म्हणजे या परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीतील महिलांची बदनामी असून, त्यावर संबंधीतांवर गुन्हा दाखल होण्यासाठी छावणी मंडळाचे उपाध्यक्ष मुसद्दीक सय्यद यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी बुधवारी भिंगार पोलिस स्टेशनवर मोर्चा नेला होता. तर प्रकरण चिघळत असताना भिंगार काँग्रेसने माघार घेवून या परिसरातील महिलांची जाहिर माफी मागितली. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
भिंगार येथे बंद अवस्थेत असलेले बस स्थानक सुरु करावे यासाठी भिंगार काँग्रेसने एस.टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक यांना निवेदन दिले होते. या निवेदनात भिंगार बस स्थानक परिसरात अनैतिक व अवैध व्यवसाय चालू असल्याचे म्हंटले होते. भिंगार काँग्रेसचे शहराध्यक्ष आर.आर. पिल्ले यांनी त्यावर खुलासा केला. नजर चुकीने असे निवेदनात लिहीले गेले असून, त्याबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
भिंगार काँग्रेसच्या वतीने श्याम वाघस्कर व मार्गरेट जाधव यांनी गुरुवारी इंदिरानगर झोपडपट्टीत जावून, येथील महिलांची हात जोडून माफी मागितली. यावेळी आर.आर. पिल्ले, छावणी मंडळाचे उपाध्यक्ष मुसद्दीक सय्यद उपस्थित होते. महिलांचे समाधान झाल्याने यावर पडता पडला. तसेच न्याय मिळवून देण्यास छावणी मंडळाचे उपाध्यक्ष मुसद्दीक सय्यद यांनी पुढाकार घेतल्याने महिलांनी त्यांचा सत्कार केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.