अजितदादांच्या ‘अंबालिका’ने शेतकऱ्यांचे पैसे थकविले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अंबालिका कारखाना ऊस गाळपात आघाडीवर असला तरी शेतकऱ्यांचे पैसे देण्यात मात्र मागे आहे. ऊस गळीत हंगाम सुरू होऊन पावणे दोन महिने झाल्यानंतर जिल्ह्यातील अंबालिका कारखान्याने ऊस उत्पादकांचा कोट्यावधी रुपयांचा पहिला हप्ता थकविला आहे. पहिला हप्ता न दिल्याने कारखान्याला साखर आयुक्तालयाने नोटीसा काढून कारवाई सुरू केली आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
यंदाच्या हंगामात चौदा सहकारी व सात खासगी अशा एकूण २१ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. ऊस गाळप जोरात सुरू असून, सुमारे ३७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊस तोडल्यापासून चौदा दिवसात शेतकऱ्यांना पहिल्या हप्ता देणे साखर कारखान्यांना बंधनकारक आहे. जिल्ह्यातील १८ कारखान्यांनी पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला आहे. परंतु कर्जतमधील अंबालिका, शेवगावमधील गंगामाई, नगर तालुक्यातील पियुष या तीन कारखान्यांनी मात्र ऊस उत्पादकांचे पैसे थकविले आहे.

हे कारखाने सुरू होऊन पावणे दोन महिने झाले आहे. अंबालिकाने एफआरपीनुसार ऊस उत्पादकांचे ६४ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम थकविली आहे. या कारखान्यांसमोर शेतकरी संघटनांना आंदोलन करून या कारखान्याने पहिला हप्ता जाहीर केला नाही. त्याचबरोबर ऊस उत्पादकांचे देणे दिले नाही. गंगामाई कारखान्याच्या दरावरील आंदोलनात पोलिस गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यानंतर गंगामाईने टनामागे २५२५ रुपये असा दर जाहीर केला होता. परंतु प्रत्यक्षात या कारखान्याने ऊस उत्पादकांचे देणेच दिले नाहीत. ऊस उत्पादकांचे पैसे थकविल्यानंतर या कारखान्यांना प्रादेशिक साखर उपसंचालक संगिता डोंगरे यांना नोटीसा दिल्या होत्या. त्यात कारखान्याने लवकर पैसे देऊ असे सांगितले होते. त्यानंतर पैसे न दिल्याने आता साखर आयुक्तालयानेच या कारखान्याच्या व्यवस्थापनाला आता नोटीस देऊन कारवाई सुरू केली आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.