कपाशीवर बोंडअळीच्या आक्रमणाने शेतकरी हवालदिल

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शेवगाव तालुक्यात कपाशीच्या पिकावर बोंडअळीच्या आक्रमणाने उत्पादनात जवळपास ८० टक्क्यांची घट होवून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासकीय स्तरावरुन बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
घोटण परिसरात महसूल व कृषी विभागामार्फत हे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात शासकीय मदतीबाबत उदासीन धोरण राबवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोडाला पाने पुसणाऱ्या शासनाने आतातरी बोंडअळीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी होत आहे.

बोंडअळीमुळे राज्यातील इतर भागाप्रमाणेच शेवगाव तालुक्यात देखील कापसाच्या उत्पादनात यंदा कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. बोंडअळीच्या प्रादूर्भावाने कपाशीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

अशी मागणी वारंवार केल्यानंतर अखेर शासनाला जाग आली. आता कुठे पंचनामे करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, यापुढील सर्व प्रक्रियेतील वेळकाढूपणामुळे शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी मदत मिळेल की नाही? असा संभ्रम निर्माण झाला असला तरी हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी मदतीची आस सोडलेली नाही.

तालुक्यातील घोटण सजा अंतर्गत घोटण तसेच आंतरवाली, तळणी परिसरात बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कपाशी पिकांचे पंचमामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कृषी सहाय्यक प्रतिभा उभेदळ, कामगार तलाठी विष्णू खेडकर हे शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेटी देऊन पंचनामे करीत आहेत. 

पीक पाहणी प्रक्रियेत ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करणे आवश्यक आहेत अशांनी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. घोटण येथील पोपट दौंड, वसंत टाकळकर, राजेंद्र घुगे, मधुकर दौंड, माणिक मोटकर, संजय दौंड, रामनाथ मोटकर, वसंत मोटकर, दिनकर आव्हाड आदींसह शेतकरी याकामी मदत करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.