गणेश भुतकर हत्येप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिंगणापुरातील गणेश भुतकर हत्येप्रकरणी गुरुवार दि.२१ रोजी पहाटे ५.३० वा. शनीशिंगणापूर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल झाला आहे. दुपारी १ वाजता मयत गणेश भुतकर याचा मृतदेह औरंगाबाद घाटी रुग्णालयातून शिंगणापूर येथे आणण्यात आला. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवसभर शिंगणापूर बंद होते. सायंकाळी काही प्रमाणात दुकाने उघडल्या गेल्या. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत गणेशचा भाऊ रामेश्वर मच्छिंद्र भुतकर (रा.शनी शिंगणापूर) याने शिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, बुधवार दि.२० च्या सायंकाळी ६ वाजेण्याच्या दरम्यान दत्तु बानकर यांच्या मालकीच्या मोकळ्या पटांगणातील शनीराज पार्किंगमध्ये अविनाश चांगदेव बानकर, पंकज बानकर, अर्जुन सुरेश महाले, लखन नामदेव ढगे, भाऊराव ढमाले सर्व रा.शिंगणापूर व मयूर हरकल, गणेश सोनवणे (रा.घोडेगाव, ता.नेवासा) व इतर २ ते ३ अज्ञात तरुणांनी गणेश भुतकरवर तलवार, कुऱ्हाड, लाकडी दांडके व गावठी कट्टे यांचा वापर करून मागील शेतीच्या व्यवहाराच्या कारणावरून हल्ला केला.

त्यावेळी गणेशच्या छाती, हात, डोक्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या व त्यात तो मृत्यू पावला. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक संगीता राऊत पुढील तपास करीत आहेत.कालच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधिक्षक रोहिदास पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत पुढील मार्गदर्शन केले. तर शेवगाव विभागाचे पोलीस उपअधिक्षक अभिजीत शिवथरे यांनी गुरुवारी दिवसभर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. 

दुपारी अंत्यविधीचे वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता व चोहोबाजुंनी पोलीस बंदोबस्त तैनात होता. सध्या शिंगणापूर येथे स्ट्रायकिंग फोर्स पथक, सोनईचे १०, नेवासा १५, शिंगणापूर ३० एवढे पोलीस कर्मचारी गावभर पोलीस बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले असून वेगवेगळ्या पॉईंट व गस्त पहारा देत आहे. ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सीक लॅब व्हॅनचे रक्त व पावलांचे ठसे घेतलेले आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ जीप नंबर प्लेट नसलेली आज गणेशवाडी (ता.नेवासा) येथील किसनदेव बेल्हेकर यांच्या शेतात सापडली असून पोलिसांनी ही स्कॉर्पिओ ताब्यात घेतलेली आहे.मयत व आरोपी दोघांवर सुध्दा यापूर्वी सोनई, शिंगणापूर व नगर पोलिसांत विविध गंभीर गुन्हे दाखल झालेले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.