सार्वजनिक बांधकाम विभागाला निंबळक बायपास दुरुस्ती करण्यास मुहूर्त मिळाला !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बायपास रस्ता दुरुस्त करण्यासाठी अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने तयारी दाखवली असून या कामास २६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. बायपास दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या खड्डेमुक्त बायपास समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रस्त्याची पाहणी केली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याची झालेली दुर्दशा, रस्त्यावरील धुळीमुळे पिकांचे होत असलेले नुकसानीबाबत अधिकाऱ्यांना माहिती दिली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
राज्यातील रस्त्यांवरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजवण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या घोषणेची मुदत संपल्यानंतरही बायपास रस्ता दुरुस्त झाला नाही. त्यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा बांधकाम विभागास निवेदन देत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. 

त्यावर रस्त्याची पाहणी करुन रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी समितीला दिले. त्यानुसार गुरुवारी बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बायपास रस्त्याची पाहणी केली. रस्त्यात किती ठिकाणी खड्डे पडले आहे. कोणत्या ठिकाणी पॅचिंगची आवश्यकता आहे याची पाहणी करण्यात आली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तसेच अवजड वाहनांमुळे धूळ उडून आसपासच्या परिसरातील पिकांचेही नुकसान होत असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. रस्त्याची झालेली दुर्दशा पाहून अधिकाऱ्यांनीही जानेवारीत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करणार असल्याचे सांगितले.

(News Publish From Maharashtra Times Ahmednagar.)

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.