निळवंडे प्रकल्पासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :उत्तर नगर जिल्‍ह्यातील जिरायती पट्ट्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण प्रकल्‍पासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सातत्‍याने केलेल्‍या पाठपुराव्‍यामुळे ७० कोटी रुपयांचा निधी राज्‍य सरकारने मंजूर केला आहे. निळवंडे धरणाच्‍या कालव्‍यांची कामे पूर्ण व्‍हावीत, यासाठी नाबार्डच्‍या ग्रामीण पायाभूत विकास निधी २३ या योजनेंतर्गत निळवंडे प्रकल्‍पासाठी निधी मंजूर करून द्यावा, अशी मागणीदेखील नागपूर आधिवेशानात केली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
अहमदनगर जिल्‍ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व राहुरी या तालुक्‍यातील व नाशिक जिल्‍ह्यातील सिन्‍नर तालुक्‍यातील एकूण १८२ गावातील ६४ हजार २६० हेक्‍टर क्षेत्राला उच्‍चस्‍तरीय कालवा व उपसिंचन योजनांद्वारे निळवंडे प्रकल्‍पातील पाण्‍याचा लाभ होणार आहे. धरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, धरणामध्‍ये पाणी साठविण्‍यास प्रारंभ झाला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मात्र निधीअभावी कालव्‍यांची कामे प्रलंबित असल्‍यामुळे लाभक्षेत्रातील गावांना या पाण्‍याचा लाभ होऊ शकत नाही. त्‍यामुळे कालव्‍यांच्‍या कामांना गती मिळावी, याकरीता जलसंपदा विभागाकडे ना. विखे पाटील यांनी सातत्‍याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्‍याला मोठे यश आले असून, निळवंडे प्रकल्‍पासाठी ७० कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला असल्‍याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले. 

कालव्‍यांची कामे अधिक गतीने पूर्ण व्‍हावीत, यासाठी आवश्‍यक असणाऱ्या निधीकरीता निळवंडे प्रकल्‍पाचा समावेश नाबार्डच्‍या ग्रामीण पायाभूत विकास निधी २३ या योजनेंतर्गत करावा, अशी मागणी ना.विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. या योजनेंतर्गत निळवंडे प्रकल्‍पास निधी उपलब्‍ध झाल्‍यास पाणीसाठ्याचा वापर लाभक्षेत्रासाठी होऊ शकेल, याकडे नागपूर हिवाळी आधिवेशनात ना.विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाचे लक्ष वेधले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.